Jowar Farming : ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत

Jowar Production : यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कणसाच्या अवस्थेत ज्वारी पीक आले आहे.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी कणसाच्या अवस्थेत ज्वारी पीक आले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडी कमीअधिक होत असल्याने ज्वारीवर रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी योग्य त्या उपाययोजना करत आहेत.  

मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे विभागात सरासरी सात लाख २० हजार २२७ हेक्टरपैकी ४ लाख ५७ हजार ७७१ हेक्टर म्हणजेच ६४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीचे पीक कणसाच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.

Jowar
Jowar Farming : पोषक वातावरणामुळे हुरड्यासाठीची ज्वारी बहरात

यंदा सुरुवातीपासून झालेल्या पावसामुळे जमिनीत अधिक ओल असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.  

पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके हे खरिपाच्या पिकांसाठीचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रब्बी हंगामात या तालुक्यांत अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते. पू्र्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.

Jowar
Jowar Sowing : नापेर क्षेत्रात ज्वारी, हरभऱ्याची पेरणी

पावसाळ्याच्या अखेरीस बराच काळ वापसा न झाल्यामुळे आणि बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्यामुळे ज्वारीएैवजी गहू आणि हरभरा पिकांला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नगरमध्येही नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी हे तालुके ज्वारीमध्ये अग्रेसर आहेत. सोलापूरमध्येही उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोड, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून काढणीस सुरुवात झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

नगर २,६७,८३४ १,४१,४०८ ५३

पुणे १,३४,३३६ ८३,६५३ ६२

सोलापूर ३,१८,०५७ २,३२,७१० ७३

एकूण ७,२०,२२७ ४,५७,७७१ ६४    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com