Sweet Sorghum Ethanol  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Sweet Sorghum : गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी खाजगी कंपन्यांना सरकारने मंजूर दिलेली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना गोड ज्वारीच्या पिकासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.

Dhananjay Sanap

Rabbi Sweet Sorghum : रब्बी हंगामातील गोड ज्वारीपासून निर्मिती केलेल्या इथेनॉलच्या खरेदी दराचा निर्णय रखडून पडलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर इथेनॉलच्या खरेदी दराचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी ऊस आणि मक्यासह गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिलेली आहे. परंतु अद्यापही गोड ज्वारीच्या इथेनॉलचे खरेदी दर निश्चित न केल्यामुळे इथेनॉल चाचण्या रखडून पडल्या आहेत. त्याचा गोड ज्वारी उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गोड ज्वारीची पेरणी जानेवारीपर्यंत केली जाते. कारण पिकाला पोषक हवामान असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामात गोड ज्वारीची पेरणी करावी की नाही, असा प्रश्न पडलेला आहे.

केंद्र सरकारने ऊसाच्या इथेनॉलची खरेदी दर प्रतिलिटर ६५.६१ निश्चित केला आहे. तर बी हेवी मॉलसिसपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलची खरेदी दर ६०.७३ रुपये प्रतिलिटर ठरवला आहे. तसेच सी हेवी मॉलसिसपासून निर्माण होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ५६.२८ रुपये निश्चित केली आहे. परंतु गोड ज्वारीच्या इथेनॉलचे खरेदी दर सरकारने निश्चित केले नाहीत. त्यामुळे गोड ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. इथेनॉलचे विपणन वर्षे नोव्हेंबर ते ऑक्टोबर असते. नोव्हेंबर संपत आला तरीही इथेनॉल खरेदीचे दर जाहीर करण्यात आले नाहीत.

गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मितीसाठी खाजगी कंपन्यांना सरकारने मंजूर दिलेली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना गोड ज्वारीच्या पिकासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. परंतु गोड ज्वारीच्या इथेनॉलचा प्रतिलिटर खरेदी दर अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे शेतकऱ्यांनी खाजगी कंपन्यांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे खाजगी कंपन्याही अडचणीत आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाला खाजगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यासाठी काही कंपन्यांनी महाराष्ट्रातील ४, उत्तर प्रदेशातील २ आणि कर्नाटक व ओरिशा या राज्यातील प्रत्येकी एका साखर कारखान्यासोबत इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याचे करार केले. परंतु अजूनही गोड ज्वारीच्या इथेनॉलचे खरेदी दर निश्चित करण्यात आले नाहीत.

खाजगी कंपन्यांच्या प्रकल्पाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचा सरकारी सुत्रांचा दावा आहे. तर शेतकऱ्यांचा गोड ज्वारी पेरणीचा कालावधी जानेवारीपर्यंत असतो. त्यामुळे सध्या सरकारने इथेनॉल खरेदीचा प्रतिलिटर ६५ रुपये ५० पैसे दर जाहीर करावा. त्यानुसार करार करणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांकडून खरेदी दर बंधनकारक करावेत. जेणेकरून शेतकरी गोड ज्वारीची पेरणी करतील, असं जाणकार सांगतात.

दरम्यान. शेतकऱ्यांना ज्वारीच्या कडब्यापासून अधिक दर मिळतो. त्या तुलनेत खाजगी कंपन्या कमी दराने गोड ज्वारीच्या दराने खरेदी करणार असतील तर मात्र शेतकरी खाजगी कंपन्यांच्या कडबा खरेदीला प्रतिसाद देणार नाहीत. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टिट्यूट फॉर द सेमी-अरीड ट्रॉपिक्स अर्थात इक्रिसॅट आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्चच्या २०१८ मधील चाचण्यानुसार साखर कारखान्यातून गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

Tur Pest : तुरीवर अळीचे आक्रमण; वातावरण बदलाचा फटका

SCROLL FOR NEXT