Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ फेब्रुवारीत गुंडाळणार कापूस खरेदी

Cotton Market : हमीदराने कापसाची भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) करीत असलेली खरेदी जानेवारीअखेर बंद होणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : हमीदराने कापसाची भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) करीत असलेली खरेदी जानेवारीअखेर बंद होणार आहे. कापसाचे दोन वेचे झाले असून उलंगवाडीची वेळ आली असून त्यानंतरचा कापूस फरदड या श्रेणीत येत असल्याने ‘सीसीआय’ त्याची खरेदी करीत नाही. परिणामी खासगी बाजारातील कापसाची उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामातील कापसाची मोठी उलाढाल सध्या बाजारपेठेत आहे. कापूस पणन महासंघ मोडीत निघाल्याने ‘सीसीआय’मार्फत कापसाची हमीदराने खरेदी सुरू आहे. कापसाचे दर रुईच्या उताऱ्यावर ठरतात. पहिल्या वेच्यातील फेअर दर्जाच्या कापसापासून रुईचा उतारा ३८ किलोवर येतो. त्यास ‘सीसीआय’ने लांब धाग्याच्या कापसास प्रति क्विंटल ७,५२५ रुपये दर दिला.

आता दुसऱ्या वेच्यातील कापसाची आवक होत असून त्यापासून रुईचा उतारा ३५ किलोच्या जवळपास येत असल्याने हमीदरात शंभर रुपयांची कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस खुल्या बाजाराच्या तुलनेत ‘सीसीआय’ला विकण्यास प्राधान्य दिले आहे. खुल्या बाजारात सरासरी ७,३६२ रुपये दर आहे. कापसाचा हंगाम आता उलंगवाडीवर आला आहे.

भाव आणखी वधारतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. हा कापूस ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्यावर बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान ‘सीसीआय’ने हमीदर कमी करीत कापसाच्या खरेदीचे प्रमाणही कमी केले आहे. जानेवारी अखेरपर्यंत ‘सीसीआय’ची खरेदी चालणार असून फेब्रुवारीत खरेदी केंद्र बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जानेवारीअखेर नंतर बाजारात केवळ फरदड कापसाची आवक होते. अपेक्षित दर्जा राहत नसल्याने या कापसाची खरेदी जिनींग व्यावसायिक करीत नाहीत. त्यामुळे जिनींगस्तरावर खरेदी केंद्र आहेत अशा ठिकाणची खरेदी बंद होते. कारण अपेक्षित आवक होत नसल्याने त्यावर प्रक्रिया आणि गाठ तयार करणे शक्य होत नाही. मात्र सीसीआयच्या स्तरावर सप्टेंबरपर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- ललित कुमार गुप्ता, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, भारतीय कापूस महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT