Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton CCI Procurement : सीसीआयची देशात ६३ लाख गाठी कापूस खरेदी; तेलंगणा सर्वाधिक ३२ लाख गाठी खरेदी पूर्ण

Cotton Market Update : ३२ लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झाला. तर महाराष्ट्रात तेलंगणाच्या निम्मी म्हणजेच १६ लाख गाठी खरेदी झाली. महाराष्ट्रात कापूस खरेदीची गती कमी आहे.

Anil Jadhao 

Pune News : खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयच्या खेरदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीसीआयने आतापर्यंत ६३ लाख गाठी कापूस खरेदी केला. यापैकी ३२ लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झाला. तर महाराष्ट्रात तेलंगणाच्या निम्मी म्हणजेच १६ लाख गाठी खरेदी झाली. महाराष्ट्रात कापूस खरेदीची गती कमी आहे.

देशातील बाजारात डिसेंबरपासून कापसाची आवक शिगेला पोचली. यंदा लागवडी काहीशा उशीरा झाल्याने बहुतांशी भागात कापसाची आवकही उशीरा सुरु झाली होती. त्यामुळे बाजारातील आवकेचा दबावही काहीसा उशीरा आला. नोव्हेंबर महिन्यापासून आवक मोठ्या प्रमाणात वाढली. याचा दबाव बाजारावर येत गेला. परिणामी खुल्या बाजारात कापसाचे भाव दबावात येत गेले. बाजारात सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी भावपातळी आहे. त्यामुळे सीसीआयच्या खेरदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देशातील बाजारात सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार १२१ रुपये आहे. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ७ हजार ५२१ रुपये आहे. म्हणजेच सध्या बाजारात हमीभावापेक्षा किमान ५०० ते ७०० रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे सीसीआयच्या खेरदीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

सीसीआयची ४६ टक्के खरेदी

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बाजारात आतापर्यंत जवळपास १३६ लाख गाठी कापूस बाजारात आला. त्यापैकी ६३ लाख गाठी कापूस एकट्या सीसीआयने खेरदी केला. म्हणजेच बाजारात आलेल्या एकूण कापसापैकी तब्बल ४६ टक्के कापूस सीसीआयने खरेदी केला. तर उद्योगांनी ५४ टक्के कापसाची खरेदी केली. म्हणजेच यंदा कापसाचा मोठा स्टाॅकीस्ट सीसीआय ठरला आहे.

तेलंगणात निम्मी खरेदी

सीसीआयने देशात ६३ लाख गाठी कापूस खरेदी केला. यापैकी तब्बल निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झाला. तेलंगणातील खरेदी ३२ लाख गाठींवर पोचली. म्हणजेच एकट्या तेलंगणात निम्मा आणि इतर सर्व राज्यांमध्ये निम्मा कापूस खरेदी करण्यात आला.

महाराष्ट्रातील खरेदी

देशात तेलंगणानंतर महाराष्ट्रात कापसाची खरेदी झाली. सर्वाधिक खरेदी झालेला तेलंगणा आणि महाराष्ट्रातील खरेदीतील फरक तब्बल ५० टक्के आहे. तेलंगणात ३२ लाख गाठी खरेदी झाली. तर महाराष्ट्रात केवळ १६ लाख गाठी खरेदी झाली. म्हणजेच तेलंगणापेक्षा निम्मीच खरेदी महाराष्ट्रात होऊ शकली. तसेच महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्येच ४८ टक्के म्हणजेच जवळपास ७६ टक्के खरेदी झाली.

राज्यनिहाय कापूस खरेदी (लाख गाठींमध्ये)

राज्य…खरेदी

तेलंगणा…३२

महाराष्ट्र…१६

गुजरात…५

आंध्र प्रदेश…३

कर्नाटक…३

इतर…४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

Chief Secretary Review: नोंदणी, मुद्रांक विभागाचा मुख्य सचिवांकडून आढावा

Ajit Pawar Condolence Meeting: दादांच्या योगदानाबाबत बारामतीत कृतज्ञता व्यक्त

Natural Farming: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

SCROLL FOR NEXT