Cashew Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market: सिंधुदुर्गात काजू बीला चांगला दर! किंमत १७०-१८० रुपये प्रतिकिलो

Cashew Price: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीच्या दरात स्थिरता असून, परिपक्व काजू बीला १७०-१८० रुपये प्रतिकिलो तर ओल्या काजू बीला १३० रुपये दर मिळत आहे. अजूनही उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसल्याने दर वाढण्याची शक्यता आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व काजू बीला प्रतिकिलो १७० ते १८० रुपये दर मिळत असून ओल्या काजू बीला प्रतिकिलो १३० रुपये दर मिळत आहे. काजू बीच्या उत्पादनात अजूनही अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे काजू बीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्याची १८ तारीख उजाडली असली तरी अजूनही काजू बीचे अपेक्षित उत्पादन येत नसल्याचे चित्र जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये आहे. दोडामार्ग, बांदा परिसरात काही प्रमाणात काजू बीची आवक सुरू आहे. कीड, रोग आणि वाढलेल्या तापमानामुळे आलेल्या मोहोरांचे फळधारणेत रूपांतर झालेले नाही.

त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या बांदा, सावंतवाडी आणि दोडामार्ग या परिसरात किरकोळ स्वरूपात काजू बी बाजारपेठेत येत आहे. या काजू बीला चांगला दर मिळत आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रतिकिलो १६५ ते १७० रुपये, बांदा बाजारपेठेत १७० ते १८० रुपये असा दर काजू उत्पादकांना मिळत आहे. या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ओल्या काजू बीची सर्व जिल्ह्यांत खरेदी विक्री सुरू आहे. ओल्या काजू बीला प्रतिकिलो १३० रुपये इतका दर मिळत आहे. तर ओल्या काजूगराला प्रतिकिलो १ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ओली काजू बी शेकडा २५० ते ३५० रुपये दर ओला काजूगर शेकडा ३०० ते ४०० रुपयांनी विक्री केला जात आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांतून ओल्या काजूगरांना मोठी मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT