Dairy
Dairy  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dairy : नॅचरल दूध देणार दूध उत्पादकांसह संकलकांना बोनस ः बी. बी. ठोंबरे

टीम ॲग्रोवन

शिराढोण ः नॅचरल दूध प्रकल्पाला (Natural Milk Group) नफा झाल्याने दूध उत्पादक (Milk Producer) आणि संकलकांना (Milk Collectors) दिवाळीच्या बोनस (Diwali Bonus) देणार असल्याची माहिती कृषीरत्न बी. बी. ठोंबरे (B. B. Thomare) यांनी दिली.

नॅचरल उद्योग समूहाच्या दूध प्रकल्पाचा मागील आर्थिक वर्षातील कामकाज समाधानकारक झाले असल्याने आणि मागील वर्षी नॅचरल डेअरीला समाधानकारक नफा झाला असल्याने नॅचरल डेअरीचे दूध उत्पादकांना त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांनी प्रति लिटर १० पैसे या प्रमाणे दूध उत्पादकांना बोनस जाहीर केला.

नॅचरल डेअरीचे दूध उत्पादकांना मिळणारा बोनस हा २८ लाख ७५ हजार रुपये एवढा असल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले. त्याच बरोबर दूध संकलकांनाही बोनस द्यावयाचे ठरले असून त्यांना ही दहा लाख रुपये बोनसचे स्वरूपात स्टीलचे ४० लिटर क्षमतेचे दुधाचे कॅन देणार असल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले.

दूध उत्पादकांना प्रति लिटर दहा पैसे आणि दूध संकलकांना स्टील कॅनचे स्वरूपात असा एकूण ३८ लाख ७५ हजार रुपये नॅचरल डेअरी मार्फत बोनस वाटप करणार असल्याचे बी.बी.ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Katol APMC : उच्च न्यायालयाची पणनमंत्र्यांना नोटीस

Pesticide Use : कीडनाशकांच्या अतिवापराविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Crate Production : अमरावती जिल्हा झाला क्रेट उत्पादनाचे हब

Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT