Banana Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Farming: बाजार समित्यांच्या जाहीर दरापासून केळी उत्पादक दूरच

Market Price Manipulation: जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बाजार समित्यांनी जाहीर केलेल्या दरांपेक्षा कमी दर मिळत आहेत. व्यापारी थेट शिवारातच स्वस्तात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: जळगावमधील रावेर, चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, गिरणा पट्टा केळीसाठी ओळखला जातो. या परिसरात अनेक गावांत मुख्य पीक म्हणून केळीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे परिसरात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार किंवा जे दर बाजार समित्या जाहीर करतात, त्यानुसार दर मिळत नसल्याची तक्रार केळी उत्पादकांत आहे.

बाजार समितीकडून १६०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर जाहीर होत आहे. पण व्यापारी एक हजार ते १४०० रुपये प्रति क्विंटलला केळीची थेट किंवा शिवार खरेदी करीत आहेत. जाहीर दर किंवा फलकभाव आणि थेट खरेदीचे दर यामध्ये तब्बल सातशे ते आठशे रुपयांची तफावत आहे. व्यापारी पिळवणूक करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अनेकदा केली. पण दखल कुठलीही बाजार समिती घेत नाही.

केळी पिकाला वाढविण्यासाठी बळीराजा दिवस रात्र एक करतो. मात्र कधी वादळी वारा तर कधी अति तापमानाने मोठे नुकसान होते. लागवडीपासून तर काढणीपर्यंत केळी पिकासाठी मोठा खर्च येतो.

पण कमी दर दिले जात असतानाच खरेदीदार मनमानी करीत असल्याने केळी उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघाने यात लक्ष घालून खरेदीदारांवर कारवाई करावी व शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्ती केली जात आहे.

केळीवर ‘सीएमव्ही’, ‘करपा’ रोगांचा प्रादुर्भाव असतो. उत्पादन खर्च वाढला असून, पण जे दर केळीला रावेर, चोपडा आदी बाजार समित्या जाहीर करतात, ते दर केळीला मिळत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT