Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate: खानदेशात केळी बाजारात स्थिरता; दर १८०० ते २१०० रु. प्रतिक्विंटल

Khandesh Banana Market: खानदेशातील केळी बाजारात सध्या स्थिरता असून, दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. निर्यात कमी असल्याने दरामध्ये फारसा बदल झालेला नाही. पुढील आठवड्यात तापमान वाढल्याने आवक वाढण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळीची आवक वाढत आहे पण दर १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटवर स्थिर आहेत. सध्या प्रतिदिन ३४ ते ४५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवक कमी असल्याने केळी दर स्थिर आहेत.

केळी निर्यात सध्या रखडत सुरू आहे. सध्या आगाप लागवडीच्या मृग बहर बागांतून केळीची आवक अल्प आहे. पण पिलबाग केळीमधून आवक सुरू आहे. या केळीचे दर कमी आहेत. या केळीस १३०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत. कांदेबाग केळीत काढणी आटोपली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात केळीची आवक आहे. पण ही आवक कमी आहे. पुढील आठवड्यात आवकेत वाढ होईल, असे संकेत आहेत. तापमानात वाढ होत आहे. यामुळे केळी पक्व होण्याची गती वाढून केळीची आवक वाढेल, असे संकेत आहेत.

निर्यातही सुरू

दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीचे दर २२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. काही शेतकऱ्यांच्या केळीची जामनेर, जळगाव भागातून निर्यातही झाली आहे. परंतु निर्यात कमी आहे. निर्यातक्षम केळी थंडीमुळे सध्या कमी उपलब्ध आहे. परंतु पुढे निर्यातक्षम केळी उपलब्ध होईल. या केळीचे दर काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीएवढे असल्याने अनेक जण निर्यातीसंबंधी केळी देत नसल्याची स्थिती खानदेशात आहे.

बऱ्हाणपुरातील आवकही कमी

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक कमी आहे. तेथे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर भागांतूनही केळीची पाठवणूक केली जाते. परंतु सध्या रावेर, मुक्ताईनगर भागात केळीची आवक कमी असल्याने तेथील केळी बऱ्हाणपुरात फारशी जात नसल्याची स्थिती आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी भागांतही केळीची आवक कमी असून, तेथे रोज ३० ते ३२ ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही कमाल दर २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

Strawberry Farming: घनवटवाडीत स्ट्रॉबेरीच्या पिकाची गोडी

Sugar Rate: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता

SCROLL FOR NEXT