Banana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate: खानदेशातील बाजारात केळीचे दर स्थिर

Khandesh Banana Market: खानदेशात केळी दर मागील २० ते २२ दिवसांपासून स्थिर आहेत. केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांत आणखी घटली आहे. कमाल दर २६०० व किमान १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात केळी दर मागील २० ते २२ दिवसांपासून स्थिर आहेत. केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांत आणखी घटली आहे. कमाल दर २६०० व किमान १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

केळीला उठाव आहे. उत्तरेकडील मॉल्स व अन्य बाजारांत केळीची मागणी आहे. दर्जेदार केळीस अधिकची मागणी आहे. परंतु आवक कमी आहे. कारण मागील हंगामात मृग बहरात जून व जुलै महिन्यात अनेकांनी केळी लागवड कुकुंबर मोझॅक विषाणूच्या (सीएमव्ही) भीतीने टाळली होती.

परिणामी, मे महिन्यात केळीची आवक सतत घटली. केळीची आवक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही सध्या ९० ते १०० ट्रक (एक ट्रक १० ते १६ टन क्षमता) एवढी आहे. तर खानदेशात सध्या प्रतिदिन १८० ते १९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ही आवक या आठवड्यात आठ ते १० ट्रकने घटली आहे.

धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव भागातील केळीला पाऊस व वादळाचा फटका बसला आहे. यामुळेदेखील केळी आवक घटली आहे. पुढे केळी आवकेत आणखी घट होईल. कारण अनेक बागांमधील काढणी ७० ते ८० टक्के पूर्ण झाली आहे.

‘सीएमव्ही’चा फॅक्टर

कुकुंबर मोझॅक विषाणूची (सीएमव्ही) समस्या दर वर्षी जून व जुलै महिन्यांत लागवडीच्या केळी बागांत येत असल्याने मागील हंगामात अनेकांनी या महिन्यात केळी लागवड टाळली. परिणामी मे महिन्यात केळी आवक घटली. यामुळे केळी दर स्थिर आहेत. मागील हंगामात केळीची आवक मे महिन्यात प्रतिदिन २८० ट्रकपर्यंत होती. परंतु यंदा ही आवक कमी आहे.

‘सीएमव्ही’, उष्णतेचा प्रकोप जून व जुलैमध्ये लागवडीच्या केळी बागांना अधिक सहन करावा लागल्याचे अनुभव आहेत. यामुळे मागील हंगामात या काळात केळी लागवड घटली. परिणामी सध्या केळीची आवक कमी असून, दर स्थिर आहेत.
प्रेमानंद महाजन, केळी व्यापाराचे जाणकार, तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT