Jalgaon News : खानदेशात केळीच्या दरात मागील चार ते पाच दिवसांत काहीशी घट झाली आहे. कमाल दर २२०० ते २६०० व किमान दर १२०० ते १९५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. उत्तरेकडे केळीची साठवणूक बऱ्यापैकी झाली आहे. तसेच तेथे आंध्र प्रदेशातून केळीची पाठवणूक वाढत असल्याने दरात किंचित घट झाली आहे.
मागील आठवड्यात काश्मीर, पंजाबला पाठवणुकीच्या केळीचे कमाल दर २७०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल होते. पण ते आता २६०० रुपये आहेत. जुनारी बागांमधील (काढणी ९५ टक्के पूर्ण झालेल्या बागा) केळीचे दर, १००० ते १२०० रुपये आहेत.
खानदेशात केळीच्या आवकेत फारशी वाढ या आठवड्यात झालेली नाही. ती ८० ट्रकपर्यंत (एक ट्रक १६ टन क्षमता) कायम आहे. परंतु उत्तर भारतात नवरात्रोत्सवासंबंधी खरेदीदारांनी शीतगृहामध्ये केळीची साठवणूक केली आहे. यामुळे दरातील वाढ मागील आठ ते १० दिवसांत थांबल्याची स्थिती आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सप्टेंबरच्या सुरवातीला दर ३२०० रुपयांपर्यंत पोहचले होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत केळीची आवक सुरू आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पिलबाग किंवा खोडवा बागांतून काहीशी आवक होत आहे. परंतु ती कमी आहे.
रावेर तालुक्यात प्रतिदिन सरासरी १० ट्रकदेखील आवक नाही. पुढील आठवड्यात चोपडा, जामनेर, जळगाव भागात आवक काहीशी वाढेल. सध्या जामनेरात केळीची आवक वाढली आहे. येथील दर्जेदार केळीची पाठवणूक काश्मीर, पंजाब, दिल्ली आदी भागांत केली जात आहे.
आंध्र प्रदेशातील आवकेचा दरावर परिणाम
आंध्र प्रदेशातील ताडबत्री व इतर भागांतून केळीची आवक वाढत आहे. या भागातील केळी उत्तर भारतात पाठविली जाते. खानदेशातील केळीचे कमाल खरेदीदारदेखील उत्तर भारतात आहे. आंध्र प्रदेशातून नोव्हेंबरमध्ये केळीची आवक आणखी वाढेल. परिणामी खानदेशातील केळीला स्पर्धा तयार होईल. यामुळे दरांत काहीशी नरमाई येईल, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.