Washim News: महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले..वाशीम तालुक्यातील अनसिंग व मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते..Maharajaswa Abhiyan : महाराजस्व सेवा पंधरवड्यास वाशीम जिल्ह्यात प्रारंभ.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील प्रत्येकी एका महसूल मंडळात आज एकूण सहा शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये या अभियानाचा एकाच दिवशी शुभारंभ झाला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..Majhi Vasundhara Abhiyan: ‘माझी वसुंधरा’ अभियानात सिंदखेड ग्रामपंचायत ठरली सरस.शुभारंभाच्या दिवशी विविध महसूल प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये फेरफार २१८, सातबारा दुरुस्ती ११०, डिजिटल सातबारा ९५४, नमुना ८-अ उतारे ८४३, विविध प्रमाणपत्रे ८८८ तसेच एकल खिडकी व्यवस्थेअंतर्गत ३४३ प्रकरणे मार्गी लावण्यात आली. तसेच १५ भूसंपादन प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले, तर ३ अकृषिक प्रकरणांना परवानगी देण्यात आली..यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व रवी काळे तसेच तहसीलदार नीलेश पळसकर, सुधाकर अनासुने आदींची प्रमुख उपस्थिती होती. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रकरणे कमी करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे या उद्देशाने हे अभियान १५ मेपर्यंत जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे..लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहनजिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून प्रलंबित महसूल प्रकरणे निकाली काढणे, नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व उतारे सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणे हा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात व या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.