Banana Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : अकोला जिल्ह्यात केळीदर १६०० रुपयांपर्यंत स्थिर

Banana Market : अकोल्यातही काही दिवस केळीची प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंत विक्री झाली. नंतर हा दर दोनशे रुपयांनी कमी होऊन आता १६०० पर्यंत स्थिरावला आहे.

Team Agrowon

Akola News : स्थानिक भागातील केळीला सध्या सरासरी १६०० रुपयांचा दर मिळत आहे. दुय्यम दर्जाची केळी ७०० रुपयांना विकली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा मागील काही दिवसांपासून केळीला चांगला दर मिळतो आहे. अकोल्यातही काही दिवस केळीची प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंत विक्री झाली. नंतर हा दर दोनशे रुपयांनी कमी होऊन आता १६०० पर्यंत स्थिरावला आहे.

केळीला मागील काही महिने सातत्याने चांगला दर मिळत आला आहे. उपवासाच्या काळात केळीचा दर सुधारल्यापासून तो कमी झालेला नाही. जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये केळीचे क्षेत्र मोठे आहे. त्यातही अकोट, तेल्हारा केळी उत्पादनात अग्रेसर बनलेले आहेत. अकोटमधील पणज हा भाग केळीचे हब बनलेला आहे. जिल्ह्यात पांढरी बोर्डाच्या दरानुसार व्यवहार होत असतात. सध्या हे बोर्ड १६०० पर्यंत विकत असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यात यंदा तेल्हारा तालुक्यात केळी बागांना जूनमध्ये सुरुवातीलाच वादळाचा तडाखा बसला होता. काही बागांमधील झाडे घडांसह तुटून पडली होती. त्याचा फटका मालाला बसला. काही शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. वादळाच्या तडाख्यातून वाचलेले केळीचे प्लॉट काढणीवर आहेत. केळीची काढणी सुरू असून केळी कमाल १६०० रुपयांपर्यंत विकत आहे. केळीचे हे दर आणखी काही दिवस टिकून राहण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

किरकोळ विक्री दर किमान ५० ते ६० रुपये डझन

केळीची विक्री १६०० रुपये प्रतिक्विंटल दराने होत असतानाच किरकोळ विक्री दरात मोठी तफावत आहे. केळीची किमान ५० ते ६० रुपये डझन दराने अकोल्यात सर्रास विक्री केली जात आहे. आकाराने मोठे असलेल्या केळीला ६० किंवा त्यापेक्षाही अधिक दर एका डझनासाठी सांगितला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT