Chana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Market : अकोल्यात हरभऱ्याची आवक, सरासरी दरातही सुधारणा

Chana Rate : या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारातील आवक दरदिवसाला वाढत आहे.

 गोपाल हागे

Akola News : या रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बाजारातील आवक दरदिवसाला वाढत आहे. दुसरीकडे हरभऱ्याच्या सरासरी दरामध्येही सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. येथील बाजार समितीत शनिवारी (ता. ९) हरभरा सरासरी ६००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. हरभऱ्याच्या आवकेनेही पाच हजार क्विंटलचा टप्पा ओलांडला.

अकोला जिल्ह्यात व लगतच्या भागात रब्बी हंगामात हरभऱ्याची सर्वत्र लागवड केली जाते. या हंगामात पश्चिम विदर्भात हरभरा लागवडीने चार लाख हेक्टरपर्यंत झेप घेतली होती. यात बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर लागवड झाली होती. या हंगामातील हरभऱ्याची काढणी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मार्च महिन्यात हरभरा काढणीचा हंगाम पूर्णत्वास जाईल.

सध्या बाजारपेठेचा विचार केला तर हरभरा अकोला बाजार समितीत किमान ५२०० व कमाल ६३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. सरासरी सहा हजारांचा दर मिळाला. बाजारातील आवक ५८०० क्विंटलपर्यंत झाली. या हंगामातील हरभऱ्याची ही सर्वाधिक आवक मानली जात आहे.

तीन दिवसांपूर्वी हरभऱ्याचा सरासरी दर ५४४५ रुपये प्रतिक्विंटल होता. किमान दरही ४८७० तर कमाल दर ६१४० इतका होता. आता आवक व दरांमध्ये बरीच सुधारणा दिसू लागली आहे. या भागातील खारपाणपट्ट्यातील हरभऱ्याला विशिष्ट चव असून डाळ, बेसन तयार करण्यासाठी उद्योगांकडून मागणी राहत असते. त्यामुळे बाजारात चांगल्या मालाला दर दिले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT