Tamarind Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tamarind Rate : नगरमध्ये चिंचेला क्विंटलला सरासरी ६ हजार ८५० रुपये दर

Agriculture News नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिंचेला क्विंटलला ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये व सरासरी ६ हजार ८५० रुपयांचा दर मिळत आहे.

Team Agrowon

Tamarind Market Rate : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिंचेला क्विंटलला ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये व सरासरी ६ हजार ८५० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच बाजारात एप्रिल-मे महिन्यात ज्वारीची होणारी मोठी आवक यंदा मात्र जेमतेम आहे.

नगर येथे बाजार समितीत नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी भागातून मोठ्या प्रमाणात चिंचेची आवक होत असते. यंदा चिंचेची आवक कमी आहे.

मागील महिन्यात दररोज ८०० क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होत होती. सध्या मात्र दररोज ३५० ते ४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

सध्या नगरला सध्या ज्वारीची दररोज ७० ते ८० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ज्वारीला ३४०० ते ४५०० रुपये व सरासरी ३९५० रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. तूर, मूग, उडीद, हरभरा व अन्य भुसार मालाची आवक जेमतेम असून दर स्थिर आहेत.

ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा आवकेवर परिणाम

नगर जिल्ह्यातील जामखेड- कर्जत, शेवगाव, पाथर्डीसह काही भागांत गावरान ज्वारीचे पीक घेतले जाते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात ज्वारीची मोठी आवक होत असते.

अलीकडच्या काही वर्षांपासून मात्र ज्वारीचे क्षेत्र घटत आहे. यंदा तर नगरसह सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह अन्य भागांत ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याचा परिणाम नगरच्या ज्वारी बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT