Team Agrowon
कोरोना काळापूर्वी पुणे बाजार समितीतही चिंचेचे ‘मार्केट’ चांगले होते. या कोरोना काळात आवकेत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसले. त्याची विविध कारणे होती.
मजुरांद्वारे चिंच काढणी शक्य होऊ शकली नाही. चिंचेचे मुख्य ग्राहक असलेल्या भेळ, पाणीपुरी व्यावसायिकांचे स्टॉल कमी झाले.
आता चिंचेचे ‘मार्केट’ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत वातावरण कोरडे असल्याने मार्केटमध्ये चिंचेची आवक चांगली असते.
यंदाच्या वर्षी या तीन महिन्यांच्या हंगामात पुणे बाजार समितीत २०० ते २५० टनांच्या आसपास आवक होण्याची शक्यता आहे.
हॉटेल व घरगुती कारणांसाठी भाज्या, सांबर, रस्सम, पाणीपुरी, भेळनिर्मिती, चिंच गोळी, जेली, चिंचोका पावडर आदींसाठी मागण
पिवळा रंग आणि गर अधिक असलेल्या चिंचेला चांगली मागणी. जेवढी पिवळी तेवढी ती जास्त आंबट असते. जुनी, काळसर रंगाची चिंच भेळ, पाणीपुरी, चाट यासाठी वापरण्यात येते. ही चिंच तुलनेने गोडसर असते.