Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : खानदेशात कांद्याची आवक, दर स्थिर

Onion Rate : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक स्थिर आहे. दर १२०० ते २६०० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक स्थिर आहे. दर १२०० ते २६०० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. पुढेही आवक फारशी वाढणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लाल कांद्याची आवक कमी होत आहे, तशी दरातही सुधारणा दिसत आहे. मागील खरिपात कांदा दर कमी होते. खर्चही निघाला नव्हता. यामुळे अनेकांनी रब्बीत कांदा लागवड टाळली. यामुळे लागवडीत घट झाली. खानदेशात १४ हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित होती. परंतु लागवड सुमारे नऊ हजार हेक्टरवर झाली. लागवड कमी झाल्याने यंदा एप्रिलपासून कमीच होती.

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत एप्रिल व मे महिन्यांत कांद्याची आवक प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल राहिली. या महिन्यात आवक आणखी कमी झाली आहे. कांदा दरात गेल्या २० ते २२ दिवसांत क्विंटलमागे किमान एक हजार रुपयांची सुधारणा आहे. लाल कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या मध्यात किमान ७०० व कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते.

कांद्याला उठावही बऱ्यापैकी होता. परंतु कांद्याची आवक मागील २० ते २२ दिवसांत धुळे, जळगाव, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजारात कमी झाली आहे. धुळे, साक्री, पिंपळनेर, जळगाव, चोपडा, किनगाव (ता. यावल), अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव येथील बाजार कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत. या बाजारांत कांद्याची सध्या प्रतिदिन सरासरी तीन हजार क्विंटल आवक होत आहे. आवकेत निम्मी घट सध्या झाल्याची माहिती आहे.

चाळीत साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक बाजारात होत आहे. जळगाव येथील बाजारात साक्री, पिंपळनेर, धुळे भागांतूनही कांदा विक्रीस येत आहे. अडावद, किनगाव येथील बाजारातील आवकही सतत घटत आहे.

खानदेशातील धुळे, शिरपूर, यावल, चोपडा भागांतील काही शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी कांद्याची मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारातही विक्री केली होती. यामुळे स्थानिक बाजारात आवक कमी होती. परिणामी, कांदा दरावरील दबावही कमी होता.

पांढरा कांदा अल्प

पांढऱ्या कांद्याची अत्यल्प आवक बाजारात होत आहे. त्याची लागवड फारशी नव्हती. यामुळे आवक अल्प आहे. पांढऱ्या कांद्याचे दरही २५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. धुळे, जळगाव येथील बाजारात काही शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक होत आहे. या कांद्याचा तुटवडा बाजारात दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT