Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : सांगली, तासगावच्या बाजारात नव्या बेदण्याची आवक

Bedana Rate : सांगली, तासगाव बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नव्या बेदाण्याची सुमारे १६० टन आवक झाली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली, तासगाव बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नव्या बेदाण्याची सुमारे १६० टन आवक झाली. बेदाण्यास दर्जानुसार ११० ते २१० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मात्र, दर्जेदार बेदाणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी येण्याची शक्यता बेदाणा उद्योगातील जाणकरांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाण्यास प्रारंभ झाला. परंतु द्राक्षाची विक्री करून शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याचा दर्जा कमीअधिक आहे.

सांगली बाजार समितीत ५० टन बेदाण्याची आवक झाली. सांगली बाजार समितीत १८ दुकानांत बेदाण्यांचे सौदे काढण्यात आले. हिरव्या बेदाण्याला प्रतिकिलो १६१ रुपये, पिवळ्या बेदाण्यास १३१ रुपये कर काळ्या बेदाण्यास ५० रुपये असा दर मिळाला.

तर तासगाव बाजार समितीत ११० टन बेदाण्याची आवक झाली असून २५ दुकानांत बेदाण्यांचे सौदे काढले. बेदाण्याला ९० पासून २१० रुपयांपर्यंत दर मिळाला. बेदाणा निर्मितीची लगबग सुरू झाली आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दर्जेदार बेदाणा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होईल. त्यानंतर बेदाण्याच्या दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता बेदाणा व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

यंदाच्या हंगामातील बेदाणा विक्रीसाठी आला आहे. दर्जानुसार बेदाण्याला चांगले दर आहेत. यावर्षीचा बेदाणाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT