Rabi Crops Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rabi MSP 2025 : हरभऱ्याच्या हमीभावात २१० रुपयांची वाढ; मोहरीचा हमीभाव सर्वात जास्त ३०० रुपयांनी वाढवला 

Market Update : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१६) २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी दिली.

Anil Jadhao 

Pune News : केंद्राने हरभऱ्याचा हमीभाव २१० रुपयाने वाढवला आहे. हरभऱ्याला २०२५-२६ च्या रब्बी हंगामात ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. गव्हाच्या हमीभावात १५० रुपयांची वाढ केली असून २ हजार ४२५ रुपये जाहीर केला. मोहरीच्या हमीभावात सर्वाधिक ३०० रुपये तर मसूरच्या हमीभावात २७५ रुपयांची वाढ केली आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१६) २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने हरभरा हमीभाव २१० रुपयांनी वाढवला आहे. मागील हंगामात हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव होता. तो २०२५-२६ च्या हंगामात आता ५ हजार ६५० रुपये करण्यात आला.

गव्हाचा हमीभाव सरकारने यंदा १५० रुपयांनी वाढवला आहे. मागील हंगामात गव्हाचा हमाभाव २ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल होता. यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचा हमीभाव आता २ हजार ४२५ रुपये प्रतिक्विंटल असेल. 

सरकारने मसूरच्या हमीभावातही २७५ रुपयांची वाढ केली. मसूरचा हमीभाव २०२५-२६ च्या रब्बी हंगामात आता ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला. तसेच सूर्यफुलाच्या हमीभावातही १४० रुपयांची वाढ करण्यात आली. सूर्यफुलासाठी यंदाच्या रब्बीत ५ हजार ९४० रुपये हमीभाव असेल. तर बार्लीसाठी १९८० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आळा. 

मोहरीच्या हमीभावात  सर्वाधिक वाढ

सरकारने यंदा मोहरीचा हमीभाव सर्वाधिक ३०० रुपयांनी वाढवला आहे. मोहरीला यंदाच्या रब्बी हंगामात ५ हजार ९५० रुपये हमीभाव देण्यात आला. मागील हंगामात मोहरीचा हमीभाव ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल होता. खरिपात सरकारने सोयाबीनचा हमीभाव २९२ रुपयांनी वाढवला होता. महत्वाच्या तेलबिया पिकांच्या हमीभावात सरकारने समाधानकारक वाढ केल्याचे सरकारने म्हटले आहे. 

उत्पादनखर्चावर नफा

रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर करताना सरकारने उत्पादन खर्चावर नफा गृहीत धरून हमीभाव दिल्याचे म्हटले आहे. गव्हाचा हमीभाव यंदा उत्पादन खर्चावर १०५ टक्के नफ्यासह दिल्याचे सरकारने म्हटले आहे. तर मोहरीसाठी उत्पादन खर्चावर ९८ टक्के, मसूरसाठी ८९ टक्के, हरभऱ्यासाठी ६० टक्के आणि सूर्यफुलासाठी उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा गृहीत धरून हमीभाव जाहीर केल्याचा दावा सरकारने केला आहे. 

रब्ही हंगामातील पिकांचे हमीभाव 

पीक…२०२४-२५…२०२५-२६…वाढ
हरभरा…५४४०…५६५०…२१०
गहू…२२७५…२४२५…१५०
मसूर…६४२५…६७००…२७५
मोहरी…५६५०…५९५०…३००
सूर्यफुल…५८००…५९४०…१४०
बार्ली…१८५०…१९८०…१३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT