Kesar Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raw Mango : खानदेशात कैरीच्या आवकेत वाढ

Mango Season : सातपुडा पर्वतातील खाटू प्रकारच्या आंब्यांच्या कैऱ्यांना मोठी पसंती नंदुरबार जिल्ह्यात आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कैरीची आवक वाढली आहे. सातपुडा पर्वत व लगतच्या भागासह जामनेर, पाचोरा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कैऱ्यांची बाजारात आवक होत आहे.

सातपुडा पर्वतातील खाटू प्रकारच्या आंब्यांच्या कैऱ्यांना मोठी पसंती नंदुरबार जिल्ह्यात आहे. आकाराने लहान, तीव्र आंबट आणि कडकपणा यासाठी या कैऱ्या प्रसिद्ध आहेत. लोणच्यासाठी या कैऱ्यांना मोठी मागणी असते. बाजारात कैरीचे दर ४० ते ६० व सरासरी ५० रुपये प्रतिकिलो, असे आहेत. दर यंदाही स्थिर आहेत. गावरान कैरीही स्थानिक भागातून बाजारात येत आहे.

मागील वेळेसही ४० ते ६० रुपये प्रतिकिलो, असे दर कैऱ्यांना होते. यंदाही कमाल दर ६० रुपये असेच आहेत. सर्वाधिक आवक छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव, कन्नड या भागातून होत आहे. सातपुडा पर्वतालगतच्या अक्कलकुवा, तळोदा, शहादा भागातूनही कैऱ्यांची आवक होत आहे.

कैऱ्यांसाठी खानदेशात दोंडाईचा (ता. शिंदखेडा, शहादा, धरणगाव (जि. जळगाव), पारोळा (जि. जळगाव) आदी बाजार प्रसिद्ध आहेत. जळगाव येथील बाजारात अनेक शेतकरी आपल्या कैऱ्या थेट ग्राहकांना देत आहेत. शहरातील विविध बाजारांत या कैऱ्या दिसू लागल्या आहेत.

एक पाऊस आल्यानंतर गृहिणी लोणचे तयार करण्यास पसंती देतात. खानदेशात अपवाद वगळता अनेक भागात पाऊस आला आहे. यामुळे लोणचे तयार करण्याची लगबग दिसू लागली आहे. सातपुड्यालगतच्या चोपडा, अडावद, किनगाव, सावदा, होळनांथे आदी भागांतील बाजारांतही कैऱ्यांची आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT