Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयापेंड दर सुधारले; सोयाबीनचे दरही वाढण्याची शक्यता

देशातील सोयापेंडला निर्यातीसाठी मागणी वाढल्यानं दर सुधारले. जानेवारीत देशातील बाजारात ३७ हजार रुपये प्रतिटनाने सोयापेंड मिळत होती.

Anil Jadhao 

Soybean Rate Price : देशातून आता सोयापेंड निर्यात (Soyameal Export) वाढली. त्यामुळं सोयापेंडचे भावही वाढले आहेत. तरीही भारताची सोयापेंड निर्यातीसाठी पडतळ आहे. सोयापेंडचे दर वाढल्यानं सोयाबीनच्या दरातही सुधारणा होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर (Soyameal Rate) वाढल्यानंतर भारतीय सोयापेंडला मागणी वाढली. भारतातून यंदा पहिल्या चार महिन्यांमध्येच गेल्यावर्षीएवठी सोयापेंड निर्यात झाली.

ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातून ६ लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षभरातील निर्यात ६ लाख ७१ हजार टन झाली होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यातीची गती जास्त आहे.

देशातील सोयापेंडला निर्यातीसाठी मागणी वाढल्यानं दर सुधारले. जानेवारीत देशातील बाजारात ३७ हजार रुपये प्रतिटनाने सोयापेंड मिळत होती.

सोयापेंडचे भाव कमी असल्यानं निर्यात वेगाने झाली. मागणी वाढल्याने सोयापेंडचे भाव आता २२ टक्क्यांनी वाढले आहेत. देशात आता ४३ हजार ते ४५ हजार रुपयाने सोयापेंड विकली जात आहे.

आजची बाजारातील आवक

देशातील बाजारात आज ३ लाख २५ हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आली होती. महाराष्ट्रातील बाजारात सर्वाधिक १ लाख ५० हजार टन सोयाबीन आले होते. तर मध्य प्रदेशात १ लाख २५ हजार टनांची विक्री झाली. राजस्थानमध्येही २५ हजार टन सोयाबीनची आवक झाली होती.

देशातील दरपातळी

बाजारातील दराचा विचार करता आज बाजारभाव स्थिर होते. बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

तर प्रक्रिया प्लाट्सचे दर ५ हजार ५५० ते ५ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील भाव आणि प्रक्रिया प्लांट्सचे भाव मागील आठवडाभरापासून स्थिर आहेत.

सोयाबीनही सुधारण्याची शक्यता

देशातून सोयापेंड निर्यात वाढल्यानं सोयाबीनलाही मागणी वाढली आहे. सोयापेंडचे दर वाढल्यानं सोयाबीनचेही दर वाढू शकतात. तसचं खाद्यतेलाचे दरही काहीसे वाढलेले आहेत. रुपयाही डाॅलरच्या तुलनेत कुमकुवत होत आहे.

देशातील सोयापेंडचे भाव वाढले तरी अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं सोयाबीन निर्यातीची गती कायम राहील. मार्च महिन्यात विक्रमी सोयापेंड निर्यातीचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीनचे दरही वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT