Soybean Market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market: अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट

अर्जेंटीना सरकारने मात्र यंदा ३४० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. तर अर्जेंटीनाची सोयाबीन आयात काहीशी वाढू शकते, असाही अंदाज आहे.

Anil Jadhao 

Soybean price : अर्जेंटीनात यंदा दशकातील गंभीर दुष्काळ पडला आहे. त्यामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.

अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) अर्थात युएसडीएने अर्जेंटीनातील उत्पादन ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला. तसेच सोयातेल आणि सोयापेंड (Soyameal) उत्पादनही कमी राहील, असेही सांगितले.

अर्जेंटीनात मागील हंगामात ४१० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. तर यंदा हंगामाच्या सुरुवातील ५१० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. मात्र दुष्काळामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटले.

फेब्रुवारीच्या अहवालात युएसडीएने ४१० लाख टनांचा अंदाज व्यक्त केला होता. पण मार्च महिन्याच्या अहवालात त्यात ८० हजार टनाने कपात करून ३३० लाख टनांवर आणला.

युएसडीएने आपला अहवाल सादर केल्यानंतर सीबाॅटवर सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारले होते.

गाळपही घटणार

अर्जेंटीना सरकारने मात्र यंदा ३४० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. तर अर्जेंटीनाची सोयाबीन आयात काहीशी वाढू शकते, असाही अंदाज आहे.

उत्पादन घटल्याने युएसडीएने यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन गाळपही घटेल, असा अंदाज जाहीर केला. मागील हंगामात अर्जेंटीनात ३७३ लाख टन सोयाबीनचे गाळप झाले होते. ते यंदा ३५२ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला.

उत्पादनातील घट अधिक

अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला. पण अर्जेंटीनातील व्यापारी संस्थांनी उत्पादन २८० लाख टनांपेक्षाही कमी राहील, असे सांगितले.

काही संस्थांनी उत्पादन २५० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला. त्यामुळे युएसडीए सुध्दा पुढील काळात आपला अंदाज कमी करु शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी

SCROLL FOR NEXT