Russia-Ukraine war can increase Edible oil Inflation
Russia-Ukraine war can increase Edible oil Inflation 
ॲग्रोमनी

युध्दामुळे खाद्यतेल महागाई वाढण्याची भीती

अनिल जाधव

पुणेः भारताला गरजेच्या ६५ टक्के खाद्यतेल आयात (Edible oil Import) करावी लागते. मागील वर्षापासून भारताला खाद्यतेल दरवाढीचा फटका बसतोय. त्यातच आता युध्द सुरु असल्यानं सूर्यफूलासह इतर तेलांचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. असे झाल्यास आधीच खाद्यतेल महागाईचा मार झेलणाऱ्या भारताला आणखी फटका बसेल. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल, असे जाणकारांनी सांगितले.

भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत तब्बल ७० टक्के पामतेल (Palm oil) असते. देशात २०२०-२१ मध्ये १३२ लाख टन खाद्यतेल आयात झाले. त्यात ८५ लाख टन पामतेलाचा समावेश होता. ६० टक्के पामतेल हे इंडोनेशियातून येते, तर उर्वरित ४० टक्के मलेशिया आणि इतर देशांतून आयात होते. मागील हंगामात सोयातेलाची (Soybean oil) ४५ लाख टन आयात झाली होती. भारतात अर्जेंटीना आणि ब्राझीलमधून सोयातेलाची आयात होते. तर मोहरी तेल (Musturd oil) कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युक्रेनसह बांगलादेश आणि नेपाळमधून मोहरी तेल येते. मागील हंगामात ३० लाख टन मोहरी तेल आयात झाले होते. सूर्यफूल तेलाची आयात (Sunflower oil Import) २२ लाखांवर झाली होती. देशात युक्रेन, रशिया आणि अर्जेंटीनातून सूर्यफूल तेल दाखलं होतं.

रशिया आणि युक्रेन युध्दाचा सोयातेल आणि  सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो. मात्र आधिच मागील दोन वर्षांपासून खाद्यतेलाने जगालाच जेरीस आणलं. कोरोनामुळे घटलेले उत्पादन  आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळीचा परिणाम बाजारावर आजही जाणवतोय. त्यातच वाहतुक खर्च दुप्पट झाला. त्यामुळं खाद्यतेल आयातच महाग पडत आहे. उदाहरण द्यायच झालंच तर २०१९-२० मध्ये देशात १३४ लाख टन खाद्यतेल आयात झाले. त्यासाठी आपल्याला ७१ हजार ६०० कोटी रूपये मोजावे लागले. पणं कोरोना काळात, म्हणजेच मागील हंगामात आयात कमी होऊन १३२ लाख टनांवर आली. पणं त्यासाठी तब्बल १ लाख १७ हजार कोटी रूपये मोजावे लागले. म्हणजेच आयात कमी होऊनही ६० टक्के अधिक पैसे मोजावे लागले. भारताची गरज लक्षात घेऊन निर्यातदार देश संधीचा फायदा घेत आहेत.

भारत पामतेलावर अवलंबून आहे. मात्र इंडोनेशियानेही कच्चे पाम तेल निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत २० टक्के वापर अनिवार्य करून बायोडिझेलला इंडोनेशिया प्रोत्साहन देत आहे. त्यातच मलेशियात अजूनही मजूरटंचाई आणि उत्पादन घटीचं संकट कायम आहे. त्यामुळे पामतेलाने विक्रमी दर गाठला. शुक्रवारी बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पाम तेलाचे दर ६ हजार रिंगीट प्रतिटनावर होते. सहाजिकच या तेजीचा फटका भारताला बसतो आहे. तसेच भारत पामतेलानंतर सोयातेलाची आयात करतो. मात्र ब्राझील आणि अर्जेंटीना सोयातेल पुरवठादार देशांत यंदा उत्पादन घटले आहे. दोन्ही देशांत गेल्यावर्षीपेक्षा कमी उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे सोयातेल दरालाही फोडणी मिळाली. मोहरी तेलाने आधीच वाढीचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे भारताला खाद्यतेल दरवाढीचा आधिपासूनच फटका बसतो आहे.

यावरून लक्षात येते की भारताला खाद्यतेल आयातीसाठी (Edible oil Import) महागाईचा सामना करावा लागत आहे. आता युध्दामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी झाल्यास आणखी दरवाढ होणार आहे. तसेच सोयाबीन तेलाला मागणी वाढून सोयातेलासाठीही अधिक पैसे मोजावे लागतील. याचा थेट परिणाम भारतावर होईल. कारण भारताला आयातीशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती ओढावल्यास आयातीवरील खर्चात मोठी वाढ होईल, असं जाणकारांनी सांगितले. त्यामुळं हे युध्द लवकर संपूण परिस्थिती पूर्वपदावर येणं जसं या दोन देशांसाठी गरजेचंये तसंच भारतासाठीही आहे. अन्यथा खाद्यतेलाचे दर आणखी भडकण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा -

असा वाढला आयातीचा दर

सध्या कच्चे पामतेल आयात (crude palm oil import) प्रतिटन १ हजार ८१० डाॅलरने पडतेय. मागील आठवड्यात हाच दर १ हजार ५४५ डाॅलर आणि मागील वर्षी १ हजार ४६० डाॅलर होता. तर कच्या सोयातेलाची आयात १ हजार ७७७ डाॅलरने पडतेय. मागील आठवड्यात आयातीसाठी १ हजार ४७२ डाॅलर आणि मागील वर्षी १ हजार १२६ डाॅलर मोजावे लागत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT