Chana
Chana  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Procurement In Jalna : जालन्यात ९९ हजार २५४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

Team Agrowon

Jalna News : जालना जिल्ह्यात आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी (Chana Procurement ) सुरू करण्यात आलेल्या मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणातील १२ केंद्रांवरून ९९ हजार २५४ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.

श्री. हेमके यांच्या माहितीनुसार, आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, मंठा, माहोरा, जवखेडा खुर्द, अनवा, बदनापूर, मापेगाव खुर्द, परतुर, जाफराबाद व आष्टी या ठिकाणी आधारभूत किमतीने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यात सुरू झालेल्या या केंद्रांवर जवळपास १९४७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १२१८५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आधारभूत किमतीने हरभरा खरेदीसाठी एसएमएस पाठविण्यात आले.

तर ७२८६ शेतकऱ्यांना अशा प्रकारे एसएमएस पाठविणे बाकी होते. एसएमएस मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी ६२७९ शेतकऱ्यांकडील ९९२५४ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची आधारभूत ५३३५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आली.

खरेदी करण्यात आलेल्या हरभऱ्यापैकी ६१ हजार ३४८ क्विंटल ५० किलो हरभरा वखार महामंडळाच्या गोदाममध्ये साठवून ठेवण्यात आला होता. तर ३७ हजार ९०६ क्विंटल हरभरा अजूनही गोदामात साठविणे बाकी होते.

केंद्रनिहाय खरेदी केलेला हरभरा (क्विंटलमध्ये) व शेतकरी संख्या

केंद्र - हरभरा- शेतकरी संख्या

जालना - १६०७६ - ९६३

अंबड - २७४.५०- १९

भोकरदन- ११०२६- ७०३

मंठा - १०६९१.५० - ६६८

माहोरा - १५५६२- १०३५

जवखेडा खुर्द - ५०८८ -३२२

अनवा - ११५७४ - ६८३

बदनापूर- ३१५६- २११

मापेगाव खुर्द - ७२३६ - ४५०

परतुर- ९१६८- ५६५

जाफराबाद - ७६९०- ५५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT