Maize Production
Maize Production Agrowon
ॲग्रोमनी

Maize Market : पाकिस्तानचा मका भारतापेक्षा स्वस्त; पण भारताला निर्यातवाढीची संधी

Team Agrowon

Maize Rate Update : आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या पाकिस्तानचा मका स्वस्त (Maize Rate) पडत आहे. त्यामुळे भारतीय मक्याला मागणी कमी आहे. पण पाकिस्तानमध्ये मक्याचा स्टाॅक कमी आहे. तसेच अमेरिका आणि युक्रेनमधूनही मका निर्यात कमीच राहील.

त्यातच भारतात बंपर उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने भारताला निर्यातवाढीची संधी आहे, असे काही निर्यातदारांनी सांगितले.

देशात यंदा विक्रमी मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निर्यातही अधिक राहील, असं जाणकार सांगतात. पण सध्या पाकिस्तानच्या मक्याची स्पर्धा आहे.

पाकिस्तान सध्या भारतापेक्षा कमी दरात मका निर्यात करत आहे. त्यामुळे आशियातील काही देश भारताऐवजी पाकिस्तानमधून मका आयात करत आहेत. तर व्हिएतनाम मक्याची जहाजे बंदरावर आल्यानंतर कमी दरात मागणी करत आहेत.

पण पाकिस्तानकडे मक्याचा कमी स्टाॅक आहे. तसेच पाकिस्तानचा मका फक्त आग्नेय आशियातच जात आहे. त्यामुळे जास्त दिवस ही स्थिती राहणार नाही.

पाकिस्तान कमी दरात मका निर्यात करत असल्याने भारतीय मक्याला कमी मागणी असल्याचं निर्यातदार सांगत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या आर्थिक संकट आहे. पाकिस्तानच्या चलनाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन झाले. त्यामुळे पाकिस्तानचा मका स्वस्त पडतो.

पण भारतीय मक्यालाही आग्नेय आशिया आणि आखाती देशांमधून मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात भारतीय मक्याचीही निर्यात वाढेल, असा अंदाजही निर्यातदारांनी व्यक्त केला.

सध्या पाकिस्तानचा मका स्वस्त असला तरी खरेदीदार लेटर ऑफ क्रेडीटला मुदतवाढ देण्यास इच्छूक नाहीत. तसेच पाकिस्तानला सध्या कंटेनर उपलब्धतेची अडचण आहे.

भारताला पूर्वेतील देशांना निर्यातीसाठी कमी खर्च लागतो. याचा फायदा घेता येईल. यंदा भारतीय मक्याची गुणवत्ता चांगली आहे. पण फक्त पशुखाद्यासाठी मागणी असल्याने प्रिमियम मिळत नाही, असेही निर्यातदारांनी सांगितले. सध्या भारतीय मक्याला ओमान, सौदी अरेबिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांमधून मागणी आहे.

भारतीय मका महाग

सध्या भारतीय मका ३०७ ते ३१५ डाॅलर प्रतिटनाने निर्यातीसाठी मिळत आहे. तर पाकिस्तानमधील मक्याचा भाव २९३ ते २९५ डाॅलर प्रतिटन आहे. जेव्हा पाकिस्तान बंदरावर मका २८० डाॅलरने देत होता, तेव्हा भारतीय मक्याचा भाव २९५ डाॅलर प्रतिटन होता.

सध्या भारतातील बंदरांवर सरासरी २४ हजार रुपये प्रतिटनाने मका मिळत आहे. तर बाजार समित्यांमध्ये मक्याला २ हजार ते २ हजार २०० रुपये दर मिळत आहे.

रब्बीतील मका पुढील काही दिवसांमध्ये बाजारात येईल. त्यामुळे अनेक बाजारात मक्याचे भाव क्विंटलमागं १५० रुपयांपर्यंत नरमले आहेत.

भारताला निर्यातीची संधी

यंदा अमेरिकेत मका पिकाला फटका बसला. बदलत्या वातावरणाने मक्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. युध्दामुळे युक्रेनमधून किती मका निर्यात होईल, यावर प्रश्नचिन्ह आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मागणी राहील. या परिस्थितीत भारताला मका निर्यातीची संधी आहे.

भारताने २०२१-२२ मध्ये जवळपास ३७ लाख टन मका निर्यात केला होता. तर २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांमध्ये २९ लाख टनांची निर्यात झाली. यापैकी १५ लाख टन मका बांगलादेशला गेला. तर व्हिएतनामने ५ लाख ७० हजार टनांची आयात केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

Jaggery Market : कऱ्हाड बाजार समितीत गुळाला उच्चांकी दर

Agriculture Biostimulants : निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता अहवालातून सूट

Weather Update : वादळी पावसाचा इशारा कायम

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

SCROLL FOR NEXT