Angré port jaigad Agrowon
ॲग्रोमनी

Sugar Export: आंग्रे बंदरातून करणार १० लाख टन साखर निर्यात

यंदाही साखरेचे उत्पादन (sugar Production) जादा होईल. त्यामुळे जादा साखर निर्यात (Sugar Export) अपेक्षित आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘येणाऱ्या साखर वर्षात आंग्रे बंदरातून वाहतूकदार, साखर कारखाने आणि सरकारी संस्था यांच्या सहकार्याने १० लाख टन साखरेची निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे,’’ अशी माहिती बंदराचे कार्यकारी संचालक कॅप्टन संदीप गुप्ता यांनी दिली.

जयगड येथील आंग्रे बंदरातर्फे कोल्हापुरातील वाहतूकदार, साखर व्यापाऱ्यांसाठी आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. चौगुले ग्लोबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सावंगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुप्ता म्हणाले, ‘‘अनेक अडचणींशी सामना करत गेल्या वर्षी आठ लाख टन साखरेची निर्यात यशस्वी केली. यंदाही साखरेचे उत्पादन (sugar Production) जादा होईल. त्यामुळे जादा साखर निर्यात (Sugar Export) अपेक्षित आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे उद्दिष्ट साध्य करणार आहोत.’’

बंदर व्यवस्थापनाचे कोल्हापूर येथील प्रतिनिधी आणि आंग्रे पोर्ट बिझनेस डेव्हलपमेंटचे सहायक महाव्यवस्थापक विशाल दिघे यांनी बंदर सुविधा आणि भविष्यातील विकास योजनांची माहिती दिली. प्रमोदकुमार मुदुली, प्रमोद गौतम आदींनी सर्व वाहतूकदार, उपकरणे, पुरवठादार विक्रेते आणि साखर व्यापाऱ्यांचे स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

Farmer Study Tour : शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्याचे अनुदान वाढवा

Cabinet Meeting Maharashtra : यंदा तरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Farmers Protest : कापूस उत्पादकासाठी उभारणार लढा

SCROLL FOR NEXT