Insecticide India ltd
Insecticide India ltd 
ॲग्रोमनी

तिसऱ्या तिमाहीत इन्सेक्टीसाईड इंडीयाचा निव्वळ नफा ८ कोटी

टीम ॲग्रोवन

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इन्सेक्टीसाईड इंडीया लिमिटेड (Insecticides India Ltd) या किटकनाशक कंपनीच्या नफ्यात ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या ३१४.६४ कोटींच्या महसुलावर (Revenue) ८.१५ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) झाला आहे. मागील वर्षी याच कालावधित झालेल्या ३००.०२ कोटींच्या महसुलावर ५.९९ कोटींचा नफा मिळाला होता.

हेही वाचा - जागतिक पीक उत्पादनात ५३ टक्क्यांची वाढ मागील वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात डिसेंबर २०२१ अखेर ८४.६२ कोटींच्या निव्वळ नफ्यासह कंपनीने १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच कालावधित कंपनीचा निव्वळ नफा ७१.४७ कोटी इतका होता. तर आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांत कंपनीचा महसूल ४.९ टक्क्यांनी वाढून १२२८.१६ कोटी झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधित कंपनीचा महसूल ११७०.२१ कोटी रुपये इतका होता.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal) यांनी म्हटले आहे की, कोरोनाची लाट आणि निविष्ठांच्या खर्चात वाढ होऊनही कंपनीने तिसऱ्या तिमाहीत वार्षिक विक्री आणि नफ्यात स्थिर वाढ केली आहे. "चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यात आमच्या निर्यातीने १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. मागील तिमाही प्रमाणेच आम्ही शेवटच्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतो".

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT