Cashew Demand Agrowon
ॲग्रोमनी

महागाई, युद्धामुळे काजूची जागतिक मागणी मंदावणार

बहुतांशी काजू उत्पादक भागांत उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारातील काजूची आवक मंदावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Team Agrowon

जागतिक बाजारात यावर्षी काजूची मागणी मंदावणार असल्याचा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केला आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) आणि महागाईने जगातील बहुतांशी देशांचे अर्थकारण बिघडल्याचा फटका काजू उद्योग क्षेत्राला बसला आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांशी काजू उत्पादक भागात उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक घट झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारातील काजूची आवक मंदावणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला काजू उद्योगात मागणीत किमान वाढ होईल, पुरवठा स्थिर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. किमान आहे तेवढी उलाढाल होईल, अशी आशा होती. मात्र कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशातील उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात घटले.बिजनेस लाईनने या संदर्भातील वृत्त दिले आहे. भारत आणि पश्चिम आफ्रिकेतही उत्पादनाबाबत काहीशी घट होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम एकूण बाजारातील आवक घटणार असल्याचा अंदाज व्यापारी पंकज संपत यांनी व्यक्त केला आहे.

२०२२ च्या पहिल्या तिमाहीत काजूचे दर पडले होते. मात्र कच्च्या काजूचे दर स्थिर होते. त्यानंतर दरांत १२०० डॉलर्सपर्यंत सुधारणा झाली. सध्या दर १२७५ ते १३०० डॉलर्सवर गेले असल्याचे संपत म्हणाले आहेत. एप्रिल महिन्यात दरांत वाढ होत गेली आणि सध्या १३५० ते १३७० डॉलर्स अशा दराने करार होत आहेत. प्रीमियम दर्जाच्या काजूचे व्यवहार १६५० डॉलर्सपेक्षा अधिक दराने होत असल्याचे संपत यांनी नमूद केले आहे.

मूल्यवर्धित उत्पादनांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा फटका बसल्याने काजू पुरवठ्याची साखळी खंडित झाली आहे. काजू उत्पादनासाठी आणि विपणनासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज बीटा समूहाचे प्रमुख जे. राजमोहन पिल्ले यांनी व्यक्त केली आहे. सरकारने उत्पादनवाढीसाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा, उत्पादनवाढीसोबतच विपणनासाठी योजना राबवण्याची गरज असल्याचेही पिल्ले म्हणाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणासाठी सोडत निघाली; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

Banana Federation: केळी उत्पादकांचा आता अखिल भारतीय स्तरावर संघ

Agriculture Minister: कृषी पदवीधरांना शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी

Solapur Aviation: ‘सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती’

Farmer Issue: वेगवान वाऱ्यांची हवामान केंद्रांत नोंदच नाही

SCROLL FOR NEXT