Indian banana and baby corn get market access in Canada Agrowon
ॲग्रोमनी

भारताच्या केळी, बेबी कॉर्नला कॅनडाची बाजारपेठ उपलब्ध

भारतीय केळी आणि बेबी कॉर्नला कॅनडाची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी यासाठी भारत प्रयत्नशील होता. भारताच्या नॅशनल प्लान्ट प्रोटेक्शन ऑर्गनायजेशन आणि कॅनडा सरकारच्या संबंधित विभागात त्यावर बोलणीही सुरु होती.

Team Agrowon

भारतातील केळी आणि बेबी कॉर्नला आता कॅनडामधील बाजारपेठही उपलब्ध होणार आहे. कॅनडा सरकारतर्फे भारताच्या या दोन उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने शनिवारी (दिनांक ९ एप्रिल) दिलेल्या निवेदनात ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. कॅनडा सरकारने भारतीय केळी आणि बेबी कॉर्नला स्थानिक बाजारपेठेत विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.

भारतीय केळी आणि बेबी कॉर्नला कॅनडाची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी यासाठी भारत प्रयत्नशील होता. भारताच्या नॅशनल प्लान्ट प्रोटेक्शन ऑर्गनायजेशन आणि कॅनडा सरकारच्या संबंधित विभागात त्यावर बोलणीही सुरु होती.भारताकडून करण्यात आलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही बोलणी यशस्वी ठरली. कॅनडा सरकारने भारताच्या दोन्ही कमोडिटीजना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांनी ७ एप्रिल रोजी भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅक्के यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

एप्रिल २०२२ पासून भारतीय बेबी कॉर्न कॅनडामध्ये निर्यात होऊ शकेल. आयातीपूर्वी कॅनडा सरकारकडून केल्या जाणाऱ्या कसोट्या पार पाडल्यानंतर ही निर्यात शक्य असल्याचे भारतीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

केळी निर्यातीसाठी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक सुविधांमुळे भारताला केळीची नात्यात तातडीने करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय उत्पादकांना आपल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यांच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT