Edible Oil
Edible Oil Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : खाद्यतेल आयातशुल्क वाढवा, सोयापेंड निर्यातीसाठी अनुदान द्या; `सोपा`ची मागणी

Anil Jadhao 

पुणेः देशात सध्या खाद्यतेलाचे (Edible Oil Rate) दर कमी झाले आहेत. त्यामुळे खाद्यतेल (Edible Oil) आयातशुल्कात वाढ करावी, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)ने केली आहे.

तसेच सोयापेंड निर्यातीसाठी देशांतर्गत वाहतूक अनुदान द्यावे, सोयापेंड निर्यातवाढीसाठी शेजारील देशांसोबत निर्यातीचे व्यवहार रुपयात करावेत, या मागण्याही `सोपा`ने केल्या आहेत.

`सोपा`चे अध्यक्ष दाविश जैन यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. जैन यांनी पत्रात म्हटले आहे की, भारताने खाद्यतेल आयातशुल्क कमी केले आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाची आयात वाढली आहे. पण यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. तसेच सध्याची दरपातळी वर्षभर कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्याच्या किमती ग्राहकांनाही परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करणे गरजेचे आहे.

देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. मोहरीचे उत्पादनही विक्रमी १२० लाख टनांच्या दरम्यान पोचण्याचा अंदाज आहे. मोहरीची काढणी अगदी तोंडावर आहे.

देशाला खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी मोहरी आणि सोयाबीन उत्पादन वाढीची गती कायम ठेवावी लागणार आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढल्यानंतर सोयापेंडची निर्मितीही वाढली. साठ्याचा ताण कमी करण्यासाठी सोयापेंड निर्यात वाढवणे गरजेचे आहे.

सोपाने काय केल्या मागण्या

१) खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करावी. शेतकरी आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शुल्क ठरवावे.

२) २०२३-२४ मध्ये सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात रद्द करावी.

३) सोयापेंड निर्यातीवरील शुल्क आणि कर सवलतीची पातळी निश्चित करावी.

४) सोयापेंड निर्यातीवर वाहतुक अनुदान द्यावे.

५) सोयापेंड निर्यातीचे व्यवहार रुपयात करण्याची परवानगी द्यावी.

सोयापेंड निर्यातीचे व्यवहार रुपयात करा

देशात यंदा सोयापेंड उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे निर्यातही वाढवावी लागणार आहे. भारताची सोयापेंड नाॅन जीएम असल्याने ती जमेची बाजू आहे. त्यामुळे भारताच्या सोयापेंडला मोठे मार्केट आहे.

इराण, श्रीलंका आणि बांगलादेश हे शेजारी देश भारताकडून सोयापेंड आयात करत असतात. पण या देशांमध्ये सध्या पुरेसे विदेश चलन नाही.

त्याचा परिणाम निर्यातीच्या व्यवहारांवर होत आहे. त्यामुळे या देशांबरोबरचे निर्यातीचे व्यवहार रुपयात करावेत, अशी मागणीही `सोपा`ने केली आहे.

सोयापेंड वाहतूक अनुदानाची मागणी

भारतातून यंदा सोयापेंड निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत वाहतुकीवरील खर्च वाढला आहे. त्यामुळे निर्यातदारांना वाहतुकीवरच जास्त पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारने सोयापेंड निर्यातीसाठी देशांतर्गत वाहतुकीवर अनुदान द्यावे, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT