Chana Rate
Chana Rate Agrowon
ॲग्रोमनी

Chana Rate : कळमना बाजारात हरभरा दरात सुधारणा

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : प्रक्रिया उद्योजकांकडून चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याला मागणी (Chana Demand) वाढल्याने देशांतर्गत बाजारपेठेत हरभरा दरात (Chana Rate) सुधारणा अनुभवली जात आहे. कळमना बाजार समितीत देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत हरभरा दर सुधारले आहेत. गेल्या आठवड्यात ४२०० ते ४५१८ असा दर हरभऱ्याला होता. या आठवड्यात ४४०० ते ४७६५ रुपयांनी हरभऱ्याचे व्यवहार झाले. (Improvement In Chana Rate)

हरभरा डाळ तसेच बेसन करणाऱ्या उद्योजकांकडून हरभऱ्याला मागणी वाढली आहे. त्यातच नाफेडने देखील २६ लाख टन हरभरा विक्रीसाठी काढला आहे. अशा अवस्थेत येत्या काळात चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याची उपलब्धता होणार नाही अशी शंका प्रक्रिया उद्योजकांना भेडसावत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून हरभरा खरेदी आणि स्टॉक करण्यावर भर दिला जात आहे असे व्यापारी सूत्राने सांगितले. त्याचाच परिणाम हरभरा दराच्या वाढीत झाला आहे. सध्या कळमना बाजार समितीत हरभऱ्याची आवक ३४१ क्विंटलची असून गेल्या आठवड्यात ती एक हजार क्विंटलपेक्षा अधिक होती.

बाजारात तुरीच्या दरात देखील काही अंशी सुधारणा अनुभवली गेली. गेल्या आठवड्यात तुरीचे दर ६२५० ते ६७२५ असे होते. या आठवड्यात तुरीला ६००० ते ६८२१ असा दर मिळाला तुरीची आवक ३८२ क्विंटलची आहे. बाजारात सोयाबीनची देखील नियमित आवक होत आहे. ती १०० क्विंटल पर्यंत असून सोयाबीनचे दर ५३०० ते ६१२८ असे होते. बाजारात गव्हाची आवक ३०० क्विंटलची असून २४०० ते २७०० रुपये असा दर गव्हाला होता. तांदूळ आवक ३० क्विंटल आणि दर २७०० ते ३००० रुपये असा मिळाला.

--

फळ आणि भाजीपाला बाजार

बाजारात मोसंबीची आवक दोनशे क्विंटलची स्थिर आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांचे व्यवहार ४००० ते ५००० रुपये क्विंटल असून दरही स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. केळीची आवक सातत्याने कमी होत असून ती या आठवड्यात अवघ्या सात क्विंटलवर पोहोचली. केळीचे दर ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर आहेत. द्राक्षाचे व्यवहार ३००० ते ४००० रुपये क्विंटलने होत असून आवक तेरा क्विंटलची आहे. डाळिंब २००० ते १२००० रुपये क्विंटल आणि आवक ७१८ क्विंटलची होती. बाजारात आंबा आवक ६०० क्विंटल असून दर ४००० ते ५००० रुपये होते. बटाट्याची विदर्भासह मध्यप्रदेशातून आवक होत आहे. ती १२२५ क्विंटल असून १६०० ते १७०० असा दर बटाट्याला होता. कांदा आवक दोनशे क्विंटल तर दर १००० ते १४०० होता. लसुन दर ३०० ते ३५०० आणि आवक १४० क्विंटलची होती. आले आवक १०० क्विंटल आणि दर २९०० ते ३१०० असा मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT