Green chili Agrowon
ॲग्रोमनी

सोलापुरात हिरवी मिरची पुन्हा वधारलेलीच

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५००० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Sudarshan Sutaar

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Agricultural Produce Market) आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीला (Green Chili) पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. पण आवकेच्या तुटवड्यामुळे मिरचीचे दर पुन्हा तेजीत राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५००० रुपयांपर्यंत दर (Rate) मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची (Green Chili) आवक रोज १० ते २० क्विंटल अशी राहिली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत. मूळात आवक कमी आणि मागणी जास्त या तफावतीमुळे हे दर वाढल्याचे सांगण्यात येते. या सप्ताहातही पुन्हा तशीच स्थिती राहिली. त्यामुळे पुन्हा दर वधारलेले राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटला किमान ३००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय कारली, गवार, घेवडा यांचे दरही काहीसे स्थिर राहिले. (Carly, Guar and Ghewda also remained relatively stable.)

त्यांची आवकही (Incoming too) तुलनेने जेमतेमच राहिली. रोज प्रत्येकी १० ते १५ क्विंटल अशी आवक राहिली. कारल्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, गवारला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये तर घेवड्याला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT