Gold Rate
Gold Rate Agrowon
ॲग्रोमनी

सोने, चांदीच्या दरात एक हजाराची घसरण

टीम ॲग्रोवन

जळगाव : लग्नसराई, बारसे यासारखे मुहूर्त साधून होणारे कार्यक्रम आगामी काळात नसल्याने सोने, चांदी (Gold Market) बाजारात सध्या शांतता आहे. गेल्या वीस दिवसांत चांदी व सोन्याच्या दरात (Gold Rate) एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्यात गुंतवणूक (Investment In Gold) करणारे मात्र अजून दर कमी होण्याची वाट पाहत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या दरात दोन हजार ७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणुकदारांनी घेतला.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताअगोदर चांदीचा दर ६९ हजारांवर (प्रतिकिलो) गेला होता. मात्र, नंतर थेट चार हजारांची घसरण होऊन चांदीचा दर ६५ हजारांपर्यंत होता, तर सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६०० प्रतितोळा होता. चांदी ६१ हजारांवर होती.

२३ मेस सोन्याचा दरात ९०० रुपयांची वाढ होऊन ५१ हजार ५०० वर गेले, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ होऊन ६४ हजारांवर गेले. तीस मेस सोने ५१ हजार ७०० रुपये, तर चांदी ६३ हजारांवर गेली. ११ जूनला सोने ५२ हजार, तर चांदी ६३ हजार ५०० रुपये होते. बुधवारी (ता. २२) सोन्याचे दर ५१ हजार रुपये, तर चांदीचा दर ६२ हजार ५०० रुपये होता.

सोने, चांदीचे दर (जीएसटीविना) तारीख-- सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

-१४ मे : ५० हजार ६००--६१ हजार

-२३ मे : ५१ हजार ५००--६४ हजार

-३० मे : ५१ हजार ७००--६३ हजार

-१ जून : ५१ हजार-- ६२ हजार ५००

- ४ जून ः ५१ हजार ३००--६४ हजार

- ७ जून ः ५१ हजार १००--६३ हजार

- ११ जून ः ५२ हजार --६३ हजार ५००

- १४ जून ः ५० हजार ९००--६२ हजार

- १६ जून ः ५१ हजार २००--६४ हजार

- २१ जून ः ५१ हजार ३००--६३ हजार ५००

- २२ जून ः ५१ हजार--६२ हजार ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT