Soybean Rate  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखलं, मग बाजारात कुठून आलं?

शेतकऱ्यांनी यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त सोयाबीन मागं ठेवलं. त्यातच टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली.

Anil Jadhao 

Soybean Arrival : मागील हंगामात जुलैनंतर सोयाबीनला विक्रमी दर (Soybean Rate) मिळाला होता. त्यामुळे यंदा चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन एकदाच न विकता टप्प्याटप्याने विक्रीचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन मागे ठेवले.

पण दुसरीकडे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांतील बाजारातील आवक यंदा जास्त राहिली.

देशात यंदा सोयाबीनचे १२० लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. तर गेल्या हंगामातील जवळपास २५ लाख टन सोयाबीन शिल्लक होते. त्यामुळे देशात १४५ लाख टनांचा विक्रमी पुरवठा झाला. सोयाबीनचा पुरवठा अधिक होता.

त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन टप्प्याटप्प्यानं आणलं तरी उद्योगांना गरजेपुरता माल मिळत होता. त्यामुळं उद्योगांनी नोव्हेंबर वगळता सोयाबीनच्या दरात फारशी सुधारणा केली नाही.

हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी सोयाबीनची मर्यादीत विक्री करत होते. पण आर्थिक नड असलेल्या आणि थांबण्याची क्षमता कमी असलेल्या शेतकऱ्यांनी केलेली विक्री आणि मागील हंगामातील शिल्लक साठा यामुळे बाजारातील आवक जास्त राहिली.

चालू हंगामातील ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांच्या काळात प्रत्येक महिन्यातील आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहिली. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात यंदा ७१ लाख टन सोयाबीन बाजारात आलं होतं.

तर गेल्या वर्षी याच काळातील सोयाबीन आवक ५५ लाख टन होती. म्हणजेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची आवक तब्बल १६ लाख टनांनी जास्त होती.

शेतकऱ्यांनी यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त सोयाबीन मागं ठेवलं. त्यातच टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली. त्यामुळं शेतकऱ्यांकडे माल जास्त दिसत असला तरी बाजारात येणाऱ्या मालाचं प्रमाणही तुलनेनं जास्त राहिलं. त्यात मागील हंगामातील शिल्लक साठ्याचं प्रमाण जास्त होतं.

मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन असलेले शेतकरी, व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांनी हे सोयाबीन बाहेर काढल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या मार्चमध्ये शेतकरी चालू हंगामातील सोयाबीन जास्त विकत आहेत. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये आवक जास्त आहे. त्याचा दबाव सध्या सोयाबीन दरावर जाणवतोय.

मागील दोन महिन्यात अनेकदा सोयाबीन दर वाढीसाठी पुरक स्थिती होती. पण उद्योगांनी दर वाढवले नाहीत. कारण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आवक वाढेल, याचा अंदाज होता.

मार्च महिन्यात बऱ्यापैकी सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता आहे. तर एप्रिलमध्ये आवक काहीशी कमी होईल. त्यामुळे दरावरील दबावही कमी होऊ शकतो. सध्या सोयाबीन सोयाबीनला सरसरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय.

आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT