कांदा, टोमॅटोच्या दरात घसरण 
ॲग्रोमनी

कांदा, टोमॅटोच्या दरात घसरण

मूग, खरीप मका, सोयाबीन, तूर या पिकांची आवक कमी होत आहे. कापूस व हळद यांची आवक सुद्धा उतरती आहे. टोमॅटोची आवक कमी होत आहे, पण त्यात चढ-उतार आहेत. हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. मार्च महिन्यातील गेल्या चार आठवड्यांत कापूस, कपाशी, मका व मूग यांच्या किमती वाढत आहेत.

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी  

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २५ मार्च २०२२ फेब्रुवारी महिन्यात मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हळद व टोमॅटो यांच्या किमतींत उतरता कल होता. २२ फेब्रुवारी नंतर कांद्याच्या किमतीसुद्धा उतरू लागल्या आहेत. मूग, खरीप मका, सोयाबीन, तूर या पिकांची आवक कमी होत आहे. कापूस व हळद यांची आवक सुद्धा उतरती आहे. टोमॅटोची आवक कमी होत आहे, पण त्यात चढ-उतार आहेत. हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. मार्च महिन्यातील गेल्या चार आठवड्यांत कापूस, कपाशी, मका व मूग यांच्या किमती वाढत आहेत. मक्याचे उत्पादन वाढले असले तरी निर्यात मागणीसुद्धा वाढत आहे. या सप्ताहात मक्याचे भाव स्थिर होते; कापसाचे भाव वाढले. हरभरा व सोयाबीन यांचेही भाव वाढले. कांदा व टोमॅटो यांचे भाव घसरले. कांद्यातील घसरणीवर लक्ष ठेवणे जरूर आहे. पुढील काही महिने आवक वाढणार आहे.   किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत. कापूस/कपाशी MCX मधील कापसाचे व कपाशीचे  राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) फेब्रुवारी महिन्यात कमी होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.९ टक्क्यांनी वाढून  रु. ३८,०६० वर आले होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव पुन्हा ७.७ टक्क्यांनी वाढून  रु. ४०,९८० वर आले आहेत. एप्रिल डिलिवरी भाव ४.३ टक्क्यांनी वाढून रु. ४०,९५० वर आले आहेत. कपाशीचे एप्रिल डिलिवरी भाव  रु २,०२० वर स्थिर आहेत. मका मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. २,२२५ वर स्थिर आहेत. फ्युचर्स (एप्रिल डिलिवरी) किमती  रु. २,२३२ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती  रु. १,९२८ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा १३.३ टक्क्यांनी कमी आहेत.  मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे. पण रबी मक्याची आवकसुद्धा गेल्या सप्ताहापासून सुरु झाली आहे. हळद हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहातसुद्धा  त्या १.५ टक्क्यांनी घसरून  रु. ८,६९० वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. ८,८१६ वर आल्या आहेत. हळदीची आवक वाढत आहे. हरभरा हरभऱ्याच्या  स्पॉट (बिकानेर) किमती फेब्रुवारीमध्ये घसरत होत्या. या सप्ताहात  त्या २.४ टक्क्यांनी वाढून  रु. ४,९९५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे. मूग मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,३०० होती; या सप्ताहात ती ७,३५० वर आली  आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे. आवक आता कमी होत आहे.

हे हि पहा :  सोयाबीन सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात साप्ताहिक सरासरी किंमत २.३ टक्क्यांनी घसरून  रु. ७,६८१ वर आली होती. या सप्ताहात ती १.२ टक्क्यांनी वाढून  रु. ७,७७७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे. तूर तुरीची स्पॉट किंमत (अकोला) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात ती ०.४ टक्क्यांनी वाढून  रु. ६,१५० वर आली होती. या सप्ताहात मात्र ती १.८ टक्क्यांनी घसरून  रु. ६,०४२ वर आली आहे.  तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे.  तुरीची आवक कमी होऊ लागली आहे. किमती वाढत्या राहतील. कांदा कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या  सप्ताहात  रु. १,१४६ होती; या सप्ताहात ती  घसरून रु. ९०८ वर आली आहे. या सप्ताहात कांद्याची आवक वाढलेली आहे. यापुढे रबीची आवक वाढती राहील. पिंपळगावमध्ये कांद्याचे दर २२ फेब्रुवारीनंतर घसरत आहेत. कांद्याच्या किमतीवर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. टोमॅटो टोमॅटोची स्पॉट किंमत (पिंपळगाव/नाशिक) गेल्या सप्ताहात रु. १,००० होती; या सप्ताहात ती रु. ९८८ वर आली आहे.  एप्रिल आवक कमी होईल.   (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT