Pulses
Pulses Agrowon
ॲग्रोमनी

देशातील कडधान्य उत्पादन घटण्याचा अंदाज

Team Agrowon

पुणेः देशातील खरिपाची पेरणी (Kharif Sowing) आता अंतिम टप्प्यात आली. मात्र कडधान्याचा पेरा यंदा कमीच आहे. तर पावसाचाही पिकाला फटका बसतोय. त्यामुळं यंदा गेल्यावर्षीपेक्षा कडधान्याचा पेरा २० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

देशात जून ते सप्टेंबर हा माॅन्सूनचा (Monsoon) काळ मानला जातो. सध्या निम्म्याहून अधिक पावसाळा संपला. देशातील खरीप पेरणी अंतिम टप्प्याकडं जातेय तशी कडधान्य लागवडीविषयी चिंता वाढत आहे. यंदा तूर, मूग आणि उडीद लागवड आणि पिकाची स्थिती चांगली नाही. देशात खरिपातील कडधान्य लागवडीखालील सरासरी क्षेत्र १४० लाख हेक्टर आहे.

यंदाच्या लागवडीविषयीच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १६६ लाख हेक्टरवर कडधान्य पेरा झाला. मागीलवर्षी याच काळात ११९ लाख हेक्टरवर कडधान्य पीक होतं. देशात यंदा अनेक भागांमध्ये उशीरा माॅन्सून दाखल झाला. त्यामुळं पेरा पिछाडीवर आहे.

देशातील खरीप पेरणी अंतिम टप्प्यात पोचली. खरिपाची पेरणी झालेली वेळ आणि सरकार अहवाल प्रसिध्द करतं ती वेळ यात तफावत असते. त्यामुळं पेरणी अहवाल प्रसिध्द झालेल्या दिवशी प्रत्यक्ष पेरा अधिक असतो. त्यामुळं खरीप पेरणीची खरी आकडेवारी आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मिळेल. परंतु यंदा कडधान्य पेरणी सरासरी किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मागील हंगामात कडधान्यासाठी कमी दर मिळाला. त्यामुळं यंदा लागवड कमी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत देशात ३९ लाख ८० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली. तुरीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहे. तर उडदाची लागवड २ टक्क्यांनी कमी राहून जवळपास ३२ लाख हेक्टरवर पेरा झाला. तर मुगाची लागवड काहीशी वाढली. सध्या ३१ लाख हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. मात्र खरिपात कडधान्य पेरा सरासरीएवढा झाला तरी सध्याच्या अतिपावसामुळं सरकारचं उत्पादनाचं उद्दिष्ट गाठण अवघड दिसतंय. यंदा सरकाच्या उद्दिष्टापेक्षा २० टक्क्यांनी उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

उत्पादनात घट झाल्यानं कडधान्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आधीच देशात महागाई वाढली असताना डाळींचे दरही कडाडण्याची शक्यता आहे. दर कमी करण्यासाठी सरकारने मार्च २०२३ पर्यंत तूर आणि उडदाची मुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात वाढण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी सरकारने खरिपात ९४ लाख टन कडधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र प्रत्यक्षात ८६ लाख टन उत्पादन होती आलं. यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदा तूर, मूग आणि उडदाचं उत्पादन ८० ते ८५ लाख टनांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT