Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दर पडले की सावरले?

Anil Jadhao 

पुणेः आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (Cotton Market) मोठे चढ उतार सुरु आहेत. तर देशातील बाजारात दोन दिवसांपासून कापूस दरात (Cotton Rate) नरमाई दिसून आली.

पण आज बहुतेक बाजारांमध्ये कापूस दर (cotton Bajarbahv) काहीसे स्थिरावले होते. देशातील कापूस बाजारातील स्थिती पाहता दर (kapus Bhav) जास्त तुटण्याची शक्यता कमीच असल्याचं कापूस बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

देशातील कापूस दर काल नरमले होते. क्विंटलमागं दरात २०० ते ३०० रुपयांची नरमाई आली होती.

मात्र कापसाचा किमान दर कायम होता. पण कमाल दरात ही नरमाई दिसली. तर आज बहुतेक बाजारांमध्ये कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे कापूस दर कमी झाल्यानं पुन्हा एका शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली. बाजारातील आवक दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घटल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीचे दर, तसंच वायद्यांमध्येही चढ उतार आहेत. डाॅलरही काहीसा मजबुत झाला.

तसंच जागतिक मंदीच्या बातम्यांचाही परिणाम देशातील कापूस बाजारावर जाणवतोय, असं कापूस बाजारातील अभ्यासक सांगत आहेत.

आज देशात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. बहुतेक बाजारांमधील किमान दर आजही ८ हजारांपेक्षा जास्त होता.

तर महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये आज कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस दरात आजही मोठे चढ उतार दिसून आले. सीबाॅटवरील कापसाचे वायदे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढले होते.

काल कापसाचे वायदे ८३.९७ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. आपल्याकडच्या हिशोबात सांगायचं झालं, तर रुईला १५ हजार ९९ रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

पण आज बाजार सुरु झाल्यानंतर दरातील चढ उतार सुरुच होते. आज सायंकाळपर्यंत वायदे ८४.७५ सेंटवर पोचले.

रुपयात हा दर १५ हजार २४० रुपये होतो. म्हणजेच रुईचे दर १५० रुपयाने वाढले होते.

जगातील प्रत्यक्ष खरेदीचा दर


आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स काल काहीसा कमी झाला होता.

काॅटलूक ए इंडेक्स जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर दर्शवितो. काॅटलूक ए इंडेक्स काल जवळपास सव्वा टक्क्याने कमी होऊन १००.८० वर आला होता.

जगात प्रत्यक्ष खरेदीचे दर नरमल्याचा परिणाम देशातील बाजारावरही जाणवत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं.

कापूस दर किती तुटणार?

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमीच होतेय. संक्रांतीनंतर बाजारातील आवक वाढण्याची चर्चा सध्या बाजारात पसरतेय.

पण शेतकऱ्यांनी यंदा सर्वांचेच अंदाज चुकवले. त्यामुळं देशातील कापूस दर जास्त तुटण्याची शक्यता कमीच आहे.

यंदा कापसाची दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा,

असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT