Indian Dairy sector
Indian Dairy sector Agrowon
ॲग्रोमनी

यंदा दुग्ध व्यवसायाच्या महसुलात १२ टक्क्यांची वाढ?

Team Agrowon

भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या महसुलात या आर्थिक वर्षात १२ ते १३ टक्क्यांची वाढ होईल, असा कयास एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. महसुलात दोन अंकी वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष ठरणार आहे. दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या उत्पन्नात मागच्या आर्थिक वर्षात १३ टक्क्यांची वाढ झाली होती.

मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांना मागणी ( एकूण उत्पादनांच्या २८ टक्के) वाढल्यामुळे दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या महसुलात वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दुधाच्या मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनात आईस्क्रीम, कर्ड आणि फ्लेव्हर्ड मिल्कला मागणी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांना मागणी असली तरीही खरेदी किंमत, वाहतूक आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात दूध उत्पादकांच्या हाताळणीतील नफ्याचे ५ प्रमाण टक्क्यांपुरते सीमित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पारा चढल्याने या उन्हाळ्यात आईस क्रीम, कर्ड आणि फ्लेवर्ड मिल्कच्या मागणीत वाढीची अपेक्षा आहे. त्यापूर्वीच्या दोन्ही उन्हाळ्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव होता. या आर्थिक वर्षात या मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांची मागणी कायम आहे, याशिवाय तूप आणि पनीरसारख्या उत्पादनांनाही हॉटेल, रेस्टोरंटस आणि कॅफे क्षेत्राकडून चांगली मागणी आहे.

गेल्या आर्थिक वर्षातील दरवाढीमुळे या आर्थिक वर्षात दुध व्यवसायाच्या महसुलात १३ ते १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज क्रिसिल रेटिंग्जचे संचालक आदित्य झावर यांनी व्यक्त केला आहे. गेल्या आर्थिक वर्षापासून दुधाच्या दरांतही दोनदा वाढ झाली आहे. त्यामुळे थेट दुधाच्या विक्रीतूनही या क्षेत्रातील महसुलात असलेली ९ ते १० टक्के वाढ कायम राहील, असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

जून २०२१ मध्ये दुधाच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाली. फेब्रुवारी २०२२ मध्ये पुन्हा २ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे दुध विक्रीच्या माध्यमातून महसुलात सरासरी ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहतूक आणि पॅकेजिंग खर्चातील वाढीचे पडसाद म्हणून दूध उत्पादकांच्या हाताळणीतील नफा या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांवर राहील. गेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण ५.३ टक्के होते.

देशांतर्गत दुध आणि मूल्यवृद्धी केलेल्या उत्पादनांच्या मागणीमुळे स्किम्ड मिल्क पावडरची निर्यात मर्यादित झाली आहे. दुधाच्या किरकोळ विक्रीच्या दरांत झालेल्या वाढीमुळे दूध उत्पादकांच्या हाताळणी नफ्याचे प्रमाण वाढेल, असा अंदाजही अहवालात वर्तवण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT