Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस दरातील नरमाई थांबली; काही बाजारात थोडी वाढ

देशातील बाजारात आज कापसाच्या दरातील नरमाई थांबली होती. तर काही बाजारांमधील कमाल दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली.

Anil Jadhao 

पुणेः देशातील बाजारात कापूस दरातील (Cotton Rate) नरमाई आज थांबलेली दिसली. तर काही बाजारांमध्ये दरात काहीशी वाढही दिसली. पण सरासरी दरपातळी कायम होती. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर टिकून आहेत. प्रत्यक्ष खेरदीतील दर आज वाढले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील (International Market) कापसाची दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातील बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या दबावात आहेत. सरकीचे दरही कमी झाले आहेत. पण दुसरीकडं कापसाची आवक वाढली. कापसाची दैनंदीन आवक १ लाख २० हजार गाठींच्या दरम्यान असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

पण बाजारातील कापूस आवकेच्या आकड्यांबाबत मतभेदही पुढे येत आहेत. तसचं सध्या व्यापारी आणि उद्योग सांगतात त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कापूस नाही, असंही काही अभ्यासक सांगत आहेत.

देशातील बाजारात आज कापसाच्या दरातील नरमाई थांबली होती. तर काही बाजारांमधील कमाल दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये दर मिळाला.

तर सरकीचे दर ३ हजार २०० ते ३ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकीच दर कमी झाल्यानंतरही कापसाच्या दरावर दबाव आला, असं व्यापारी सांगत आहेत.

देशातील प्रत्यक्ष खरेदीचे दर कमी

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्स वाढला होता. काॅटलूक ए इंडेक्स १००.९५ सेंट प्रतिपाऊंडवर होता.

रुपयात रुईचा हा दर जवळपास २० हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. तर देशातील रुईचे दर १७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खेरदीतील दरापेक्षा २ हजार ५०० रुपयाने स्वस्त आहेत.

वायद्यांशी तुलना

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८५.८९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. रुपयात रुईचा हा भाव १५ हजार ७०० रुपये होतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दराशी तुलना करता देशातील रुईचे दर १ हजार ८०० रुपयाने जास्त आहेत.

दरावाढीचा अंदाज कायम

आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खेरदीचे दर देशातील दरापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यात वाढली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातली कापसाचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळं देशातील कापूस बाजारालाही आधार मिळेल. कापसाचे भाव पुन्हा सुधारतील. यंदाच्या हंगामात कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT