Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस आवक घटतेय; बाजार वाढेल का?

Cotton Arrival : मे महिन्यात बाजारावर कापूस आवकेचा दबाव होता. त्यामुळे चक्क मे महिन्यात हंगामातील मकी भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडला.

Anil Jadhao 

Cotton Bajarbhav News : मे महिन्यात बाजारावर कापूस आवकेचा दबाव होता. त्यामुळे चक्क मे महिन्यात हंगामातील मकी भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडला. पण आता बाजारातील कापूस आवक कमी होताना दिसत आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला.

तर पुढील काळात आवकेचा दबाव कमी होण्याचा अंदाज आहे. कापसाला सध्या ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

देशातील बाजारात कापसाची आवक काहीशी कमी झालेली दिसते. मे महिन्यात १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान असेलली आवक आता कमी झाली. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. कापसाची आवक एक लाख गाठींपेक्षा कमी होत आहे.

बाजारात ७५ हजार ते ८० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. मे महिन्यातील सरासरी आवकेच्या तुलनेत आजची आवक कमी दिसते. पण गेल्या काही दिशकांमधील मे महिन्यातील कापूस आवकेच्या तुलनेत आजही पाच पटीने जास्त आहे. म्हणजेच आवकेचा दबाव आजही कायम आहे.

मे महिन्यात आवकेचा दबाव जास्त राहीला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून बाजारातील आवकेमधील तफावत आता कमी झाली. मागील हंगामात ३१ मेपर्यंत बाजारात २ लाख ६२ हजार गाठींची आवक झाली होती. तर कालपर्यंत म्हणजेच ३१ मे २०२३ पर्यंत बाजारातील आवक २ लाख ५६ हजार गाठींची झाली.

म्हणजेच गेल्यावर्षी यंदाच्या आवकेत केवळ ७ लाख गाठींची तफावत आहे. तर उत्पादनातील तफावत ८ लाख गाठींच्या दरम्यान आहे. उत्पादनातील घट गृहीत धरल्यास आवक आता समान पातळीवर आहे.

शेतकऱ्यांकडील कापसाचा साठा आता कमी झाला. गेल्या आठवड्यापासून आवक कमी होत असल्याने दरपातळी काहीशी वाढली. तर अनेक भागांमध्ये कापसाचे भाव सुधारलेले दिसले.

कापसाने मे महिन्यात हंगामातील निचांकी दरपातळी गाठली होती. दर ७ हजारांच्याही खाली गेले होते. ते आता ७ हजारांपेक्षा काहीसे वाढले. सध्या अनेक बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

जून महिन्यात कापसाची आवक पुन्हा कमीकमी होत जाईल, असा अंदाज आहे. कारण शेतकऱ्यांकडील कापसाचा स्टाॅक कमी झाला. आता कापसाची लागवड सुरु झाली. सर्वच राज्यांमध्ये कापूस लागवड होत आहे. पण माॅन्सूनचा पाऊस अद्याप आला नाही त्यामुळे लागवडीची गती संथ आहे. सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरीच सध्या लागवड करत आहेत.

पण यंदा अनेक भागात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्याचा कापूस लागवड आणि उत्पादनावर काय परिणाम होतो? याचाही बाजारावर प्रभाव दिसेल. पुढील काळात बाजारातील कापूस आवक आणि पाऊसामान यानुसार बाजारात बदल दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: राबते हात, न मिळणारी जमीन

Cotton Ginning Industry: मदतीचा पकडा ‘धागा’

Drought Support: दुष्काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही मदतीचा हात द्या: महाफार्मर्स प्रोड्यूसर कंपनी

Sharad Joshi Fellowship: शरद जोशी फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ajit Pawar Accident Investigation: अजित पवारांच्या अपघातावर स्फोटक खुलासा करणार;रोहित पवार यांची माहिती

SCROLL FOR NEXT