Soybean Market Rate Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : चीनचा सोयाबीन वापर, आयात वाढण्याचा अंदाज

चीनच्या बाजारपेठेचा जागतिक सोयाबीन बाजारावर परिणाम होत असतो. यंदा जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएनं व्यक्त केला.

Anil Jadhao 

पुणे : चीनकडून यंदा सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार मिळत आहे. चीनमध्ये यंदा सोयाबीनचा वापर वाढण्याचा अंदाज असून आयातही गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला.

चीनमधून मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर (Soybean, Soya Meal Rate) टिकून आहेत.

चीनच्या बाजारपेठेचा जागतिक सोयाबीन बाजारावर परिणाम होत असतो. यंदा जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (Agricultural Department) अर्थात युएसडीएनं व्यक्त केला.

ब्राझीलचं उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोचणार आहे. याचा ताण बाजारावर येऊ शकतो. त्यामुळं ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक असलेल्या चीनचा वापर कसा राहतो? याकडे जगाचे लक्ष आहे.

युएसडीएच्या विदेश कृषी सेवा विभागाने चीनची सोयाबीन आयात यंदा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. २०२१-२२ च्या हंगामात चीनने ९१५ लाख टन सोयाबीन आयात केली होती. तर चालू हंगामात ९६५ लाख टनांवर चीन सोयाबीन आयात करेल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला.

तसंच चीनचा सोयाबीन वापरही यंदा वाढणार आहे. चीनमध्ये मागील हंगामात १ हजार १०७ लाख टन सोयाबीनचा वापर झाला होता. तो यंदा १ हजार १५३ लाख टनांवर पोचेल, असा अंदाजही युएसडीने व्यक्त केला.

ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन

सध्या ब्राझीलमधील सोयाबीन काढणी सुरु आहे. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानं काढणीच्या कामात व्यत्यय आणला होता.

त्यामुळं चीनने अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी वाढवली होती. यंदा ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन वाढणार आहे. ब्राझीलचं उत्पादन यंदा १ हजार ५३० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अर्जेंटीनातील उत्पादन घटले

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सोयाबीन उत्पादक आणि जागतील अग्रगण्य सोयातेल आणि सोयापेंड उत्पादक अर्जेंटीनात यंदा उत्पादन कमी राहणार आहे.

ब्युनस आयर्स ग्रेन्स एक्सचेंजने चालू हंगामात अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज ३० लाख टनांनी कमी केला. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा ३८० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज एक्सचेंजने व्यक्त केला.

चीनच्या मागणीचा बाजाराला आधार

जगात सोयाबीनचा मुख्य ग्राहक म्हणजे चीन. चीनमधील कोरोना स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. यंदा चीनचा सोयाबीन वापर वाढणार आहे. तर आयात वाढेल,  असा अंदाज आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर टिकून आहेत.

तसेच सोयापेंडचे दरही तेजीत आहेत. याचा आधार भारतातील सोयाबीन बाजारालाही मिळत आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच

Agriculture Inflation: भूलभुलय्या महागाई दराचा!

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT