Vegetable Arrival
Vegetable Arrival Agroeon
ॲग्रोमनी

नगरला आंब्याची आवक वाढली

Suryakant Netke

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात विविध जातीच्या आंब्याची आवक वाढली. भाजीपाल्याची आवक स्थिर असून दरात चढउतार सुरू आहे. दर दिवसाला सुमारे १४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात आंब्याची आवक वाढली आहे.हापूस आंब्याची दररोज १५ क्विंटलपर्यंत आवक होत असून ६ हजार ते दहा रुपये क्विंटलचा दर मिळाला. केशर आंब्याची १९ क्विंटलची आवक होऊन ७००० ते १३ हजार रुपये, बदाम आंब्याचे ११ क्विंटल आवक होऊन तीन हजार ते सहा, लालबाग आंब्याची ३२ क्विंटल आवक होऊन पाच हजार ते सात हजार रुपयांचा दर मिळाला.

भाजीपाल्यात टोमॅटोची ८० क्विंटल आवक होऊन १००० ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वांगीची ४८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते दोन हजार रुपये, फ्लॉवरची ९१ क्विंटलची आवक होऊन४०० ते ३२००, कोबीची ८५ क्‍विंटल आवक होऊन दोनशे ते सहाशे रुपये, काकडीची ७७ क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, अंगवरचे १४ क्विंटल आवक होऊन दीड हजार ते साडेतीन हजार, घोसाळ्याची नऊ क्‍विंटल आवक होऊन १००० ते २५००, कारल्याची २४ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३०००, भेंडीची ९१ क्विंटल आवक होऊन १००० ते अडीच हजार, घेवड्याची चार क्विंटल च्या ओके होऊन सहा ते नऊ हजार, बटाट्याची पावणे चारशे क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते अठराशे, हिरव्या मिरचीची ९० क्विंटलपर्यंत आवक होऊन दोन हजार ते चार हजार रुपये, शेवग्याची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १००० ते अडीच हजार रुपये, सिमला मिरचीची ६५ सेंटर पर्यंत फोन दोन हजार ते तीन हजार रूपयापर्यतचा दर मिळाला आहे.

आंबा कैऱ्यांची आवक सुरू

नगर येथील बाजारात आंबा कैरयाचीही आवक सुरू झाली आहे. सध्या दर दिवसाला ५० ते ५५ क्विंटलची आवक होत असून ८०० ते २००० रुपयाचा दर मिळत आहे. लिंबाचे दर चांगले आहेत. लिंबाला ८ हजार ते तेरा हजार रुपयांचा दर मिळत आहे. वाटाणे, पाले भाज्यांची आवकही चांगली होत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT