शेतीमालाचा वायदे बाजार
शेतीमालाचा वायदे बाजार 
ॲग्रोमनी

गहू, हरभरा, गवार बीच्या भावात वाढ

डॉ. अरुण कुलकर्णी

या सप्ताहात कापसाखेरीज इतर पिकांचे भाव घसरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गहू, हरभरा व गवार बी यांचे भाव वाढतील. या सप्ताहात माॅन्सूनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे १ जूनपासून १४ सप्टेंबरपर्यंत झालेला पाउस सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी झाला. आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, हरयाणा, प. राजस्थान, उ. कर्नाटक, गुजरात, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात आसाम, बिहार व बंगाल येथे पावसाचे प्रमाण अधिक होईल, असा अंदाज आहे. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गुजरात व सौराष्ट्र येथे कापसाखालील क्षेत्र कमी होईल असा अंदाज आहे. चांगल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात कापूस, साखर, सोयाबीन, हळद व हरबरा यांच्या किमतींमध्ये घसरता कल दिसून आला. मक्याच्या किमती वाढत होत्या. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा वाढत होत्या (रु. १,३३० ते रु. १,३९३). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. १,३६९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३२८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४१९ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरी साठी फारसे व्यवहार होत नाहीत. साखर साखरेच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ३,२२१ ते रु. ३,१३३). या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,०५५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०५० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,०५५ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ३,४२९ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,२६२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४४२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३३०, रु. ३,३५० व रु. ३,३७० आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबर नंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,४४४ ते रु. ६,८३६). या सप्ताहात त्या १.७ टक्क्यांनी घसरून रु. ६,६९६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९३१ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,८४४). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १९९० ते २०११ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०३१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९९८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०७९). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ४,१५० ते रु. ४,६२४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२७९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमतीसुद्धा १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२७९ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७४). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात १६ तारखेपासून घसरत होत्या (रु. ४,४५२ ते रु. ३,९६९). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,००३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती १.९ टक्क्यांनी वाढून रु. ३,९८५ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,०९२). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहेत. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. (रु. २४,१८० ते रु. २२,८६०). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून रु. २३,०३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,११४ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,९३० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT