खप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार स्थिरावणार
खप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार स्थिरावणार 
ॲग्रोमनी

खप घटल्याने ब्रॉयलर्स नरमले, बाजार स्थिरावणार

दीपक चव्हाण

नाशिक विभागात शनिवारी (ता. २५) रोजी ६६ रु. दरम्यान लिफ्टिंग झाले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभाव चार रु. ने नरमले आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत श्रावणचा पहिला पंधरवडा हा बाजारभावाच्या दृष्टीने सकारात्मक राहिला आहे.  खडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर म्हणाले की, शनिवारी (ता. २५) रोजी लिफ्टिंगमध्ये वाढ झाली. मागील आठवड्यातील तीन दिवस बकरी ईदमुळे कमी प्रमाणात लिफ्टिंग झाले. परिणामी पॅनिक सेलिंग वाढले होते. तथापि, शनिवारी परिस्थिती सुधारली. रविवार आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आल्याने मागणी वाढली. रविवारचे (ता. २६) रिटेल सेलिंगही चांगले होते. गुजरातमध्ये ६७ - ६८ रु. तर आंध्र व कर्नाटकात ७० ते ७२ दरम्यान बाजारभाव आहे. उत्तर भारतातील श्रावण संपल्यामुळे तेथील मागणी सुधारेल. पुढच्या आठवड्यात ब्रॉयलर पुरवठा कमी राहील. एकंदरीत महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी सध्याचा बाजारभाव टिकून राहू शकतो. यासाठी सर्वांनी सव्वा दोन किलोच्या आतच वजने राखली पाहिजेत. पुरवठा घटल्याने हॅचिंग एग्ज बाजारभाव १९.५० पर्यंत सुधारला आहे. पुढील आठवड्यात चिक्सच्या बाजारभावात सुधारणा शक्य आहे. ३१ ते ५ सप्टेंबर दरम्यान बाजारात पिल्लांची उपलब्धता राहणार नाही. कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण यांनी सांगितले, की मागील आठवड्यात ब्रॉयलर मार्केट ३ ते ४ रुपयांनी नरमले. बकरी ईदमुळे प्रामुख्याने खप घटला. मात्र, मागणीनुसार पुरवठ्याच्या नियोजनामुळे वजने आणि संख्याही नियंत्रणात होती. दक्षिण भारतात तेलंगणा व कर्नाटकातील जोरदार मागणीमुळे बाजारभाव ७० रु. वर पोचले आहेत. उत्तर भारतातील श्रावण संपला आहे. तर महाराष्ट्रात दुसरा पंधरवडा सुरू आहे. परिणामी मागणीत वाढ होऊन त्याचे रुपांतर बाजारभावात दिसू शकते. पुढील आठवड्यात बाजारभाव ६५ रु. दरम्यान स्थिरावतील, असे नाशिक येथील ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे यांनी म्हटले आहे. शेजारी राज्यातील बाजारभाव महाराष्ट्रापेक्षा उंच आहेत. महाराष्ट्रातील वजने आणि संख्या संतुलित आहे. त्यामुळे विक्रीसाठी कुठलाही दबाव नाही. म्हणून येत्या आठवड्यांत महाराष्ट्रातील बाजारभाव वर नेण्यासाठी पूरक परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले. गेल्या दोन आठवड्यांपासून टेबल एग्जचे बाजारभाव स्थिरावले आहेत. सध्याचा बाजार उत्पादन खर्चाच्या आसपास आहे. श्रावणातील घटत्या मागणीचा अंड्याच्या बाजाराला फटका बसला आहे. चालू आठवड्यातील सरासरी विक्री दर ३४० रु. दरम्यान आहे. तथापि, अनेक विभागात पॅनिक सेलिंगमुळे पेपर रेटच्या तुलनेत मोठ्या फरकाने बाजार तुटल्याचे पहावयास मिळाले. प्रतिशेकडा ३०० रु. खाली माल विकल्याच्या नोंदी आहेत.  

प्रकार भाव (रु) परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स २५ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज १९.५० प्रतिनग मुंबई
अंडी ३०५ प्रतिशेकडा पुणे

आषाढ असो की श्रावण, किफायती भाव मिळण्यासाठी एकच सूत्र आहे. ब्रॉयलर्सची वजने सव्वा दोन किलोच्या आत ठेवणे. - संजय नळगीरकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT