संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
ॲग्रोमनी

साखर उत्पादन ३९ लाख टनांवर

वृत्तसेवा

नवी दिल्ली  ः देशात ऊस गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. अाॅक्टोबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत ३९.५१ लाख टन साखर उत्पादन घेण्यात अाले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी अधिक अाहे, अशी माहिती भारतीय कारखानदार संघटनेने (इस्मा) दिली अाहे.

यंदा (२०१७-१८) देशात २५१ लाख टन टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी साखर उत्पादन २०२ लाख टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा उसाची उपलब्धतता अधिक असल्याने साखर उत्पादन वाढीचे संकेत देण्यात अाले अाहेत. अाॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यानच्या काळात ३९.५१ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी २७.८२ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. नोव्हेंबरपर्यंत देशातील ४४३ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ३९३ कारखाने सुरू होते. यंदा ऊस गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांनी संख्या अधिक अाहे.

उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी नोव्हेंबरपर्यंत १३.५९ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत येथील कारखान्यांनी ८.४८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. महाराष्ट्रातील कारखान्यांच्या साखर उत्पादनात वाढ झाली अाहे. येथील कारखान्यांनी नोव्हेंबरपर्यंत १४.९० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी येथील कारखान्यांनी ९.४२ लाख लीटर साखर उत्पादन घेतले होते.

कर्नाटकातील कारखान्यांनी ६.८२ लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गुजरातमधील कारखान्यांनी १.८० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी येथील कारखान्यांनी १.४२ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. देशातील इतर कारखान्यांनी २.४० लाख टन साखर उत्पादन घेतले अाहे. उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी लवकर गाळप सुरू केले. यामुळे येथील कारखान्यांनी अधिक साखर उत्पादन घेतले अाहे, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली अाहे. देशात ४२ लाख टन साखरसाठा शिल्लक राहणार गेल्या वर्षी देशातील साखर उत्पादनात घट झाली होती. यंदाच्या हंगामाच्या सुरवातीला ३८.७६ लाख टन साखरसाठा शिल्लक होता. गेल्या काही वर्षांतील हा नीचांकी साखरसाठा अाहे. शिल्लक साठा अाणि यंदाचे उत्पादन मिळून देशात एकूण २९२.६१ लाख टन साखरेचा पुरवठा राहील.

तर देशांतर्गत साखरेचा वापर २५०-२५२ लाख टन राहील. तर ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत देशात ४०-४२ लाख टन साखरसाठा शिल्लक राहील, असा अंदाज इस्माने व्यक्त केला अाहे.

नोव्हेंबरपर्यंतचे राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख टनांमध्ये)

 
राज्य सुरू कारखान्यांची संख्या उत्पादन
महाराष्ट्र १७० १४.९०
उत्तर प्रदेश ११० १३.५९
कर्नाटक ६० ६.८२
गुजरात १७ १.८०

स्रोत ः इस्मा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT