soybean
soybean  
ॲग्रोमनी

अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घट

टीम अॅग्रोवन

वॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज आहे. मिनेसोटा, लोवा आणि कनसास या प्रांतात सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन ३५ दशलक्ष बुशेल्सने घटून ४ हजार १३५ बुशेल्स होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ८२.३ दशलक्ष हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली. 

अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादकता ५०.२ बुशेल्स प्रतिहेक्टर राहण्याची शक्यता आहे. देशात सोयाबीन गाळप ५ दशलक्ष बुशेल्सने वाढून २ हजार २०० बुशेल्स होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्जेंटिनात पिकाला फटका बसल्याने यंदा अमेरिकेतून सोयामिल निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निर्यात यंदा २ हजार २३० बुशेल्स होण्याचा अंदाज आहे. उत्पादनात घट होणार असल्याने तसेच देशांतर्गत सोयाबीनचा वापर वाढीचा अंदाज आणि निर्यातवाढ होणार असल्याने साठा १४० दशलक्ष बुशेल्स राहण्याची शक्यता आहे, ‘यूएसडीए’ने अहवालात म्हटले आहे. 

सोयाबीन तेजीत जानेवारीत सोयाबीन आणि सोयाबीन उत्पादनांचा दर डिसेंबरच्या तुलनेत जास्त राहण्याचा अंदाज आहे. २०२०-२१ च्या हंगामात सोयाबीनचा सरासरी दर हा ११.१५ बुशेल्स राहण्याची शक्यता आहे. हा दर गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी आहे. सोयामिलचा दर हा ३९० डॉलर प्रतिशॉर्ट टन राहण्याचा अंदाज आहे. हा दर २० डॉलरने अधिक आहे. तर सोयाबीन तेलाचा दर ३८.५ सेंट प्रतिपाउंड राहील, असे अहवालात म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काहीसे कमी झाले असतानाही १३८५ डॉलर प्रतिबुशेल्सवर आहेत.    जागतिक उत्पादनातही घट तेलबियांमध्ये यंदा सूर्यफूल उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. तर सोयाबीन, सरकी, शेंगदाणा, मोहरी आणि पाम उत्पादनात घटीची शक्यता आहे. रशियात सूर्यफूल उत्पादनात ५ लाख टनांनी वाढ झाली आहे. सोयाबीन उत्पादनात मात्र मोठी घट पाहायला मिळत आहे. अर्जेंटिनात उत्पादन २ दशलक्ष टन ते ४८ दशलक्ष टनांनी घट होईल, उरुग्वेमध्ये २ लाख टन ते २.२ दशलक्ष टनांनी घट होईल. या दोन्ही देशांमध्ये डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीत सुरुवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे येथे सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे. जागतिक सोयाबीन साठा ८४.३ दशलक्ष टनांवर असण्याची शक्यता ‘यूएसडीए’ने व्यक्त केली आहे.  चीनमध्ये वाढीची शक्यता दक्षिण अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात २.१ दशलक्ष टनांनी घट होण्याची शक्यता आहे. मात्र चीनमध्ये उत्पादनात १९.६ दशलक्ष टनांनी उत्पादन वाढ शक्य आहे. चीनने यंदा सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी खरेदी केली आहे. तसेच सोयाबीन उत्पादक पट्ट्यात अनुकूल वातावरणामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर अमेरिका आणि अर्जेंटिनात सोयाबीन साठा कमी आहे. तर चीनमध्ये सध्या जगात सर्वाधिक सोयाबीन साठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT