Soybean boom uninterrupted
Soybean boom uninterrupted 
ॲग्रोमनी

सोयाबीनची तेजी अबाधित 

टीम अॅग्रोवन

पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा कायम राहण्याची शक्यता आहे. अंदाजापेक्षा उत्पादनात घट झाल्याने पुरवठ्यावर ताण आला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा झाल्याने देशांतर्गत किमतींना आधार मिळतो आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यंदा सोयाबीनेचा १३७ लाख टन उत्पादनाचा अंदाज दिला आहे, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) १०४.६ लाख टन उत्पादनाचा अंदाज दिला आहे. असे असले तरी बाजारात होत असलेली आवक बघता, ८० ते ८५ लाख टन इतकाच अंदाज व्यापारी आणि समीक्षकांनी बंधला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यात, रोजची आवक एक लाख पोत्यांपर्यंतच मर्यादित आहे.  सोयाबीनला चांगले दर मिळाल्यामुळे येत्या खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवडीत वाढ होणे अपेक्षित आहे. असे असले तरी नवीन पिकाची आवक ऑक्टोबर आधी सुरू होणार नसल्याने इतक्यातच सोयाबीनचे दर थंडावण्याची शक्यता दिसत नाही. त्याचा परिपाक सोयाबीनच्या देशांतर्गत किमतींवर झाला आहे. एनसीडीईएक्सवरील सोयबीनचे हजर (स्पॉट) भाव ६,५०० रुपयांच्यावर आहेत. मात्र एप्रिलच्या वायद्यांची सध्याची पातळी बघता भावात अजून सुधारणा अपेक्षित नाही. 

मागील आठवड्यात अकोला बाजारपेठेत सोयाबीनला ६,००० रुपयांचा दर मिळाला. तसेच वाशीम बाजार समितीत ६,३५० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. वाशीममध्ये दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. तर अमरावती आणि उमरेड बाजार समितीमध्ये भाव अनुक्रमे ६,००० आणि ६,२०० रुपयांपर्यंत गेले होते. 

सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार  ब्राझीलमधील पीक बाजारात आल्यानंतर सोयाबीनच्या किमती थंडावतील असा अंदाज होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघता, तसे होताना दिसत नाही. तसेच मलेशिया, जो पाम तेलाचा मोठा निर्यातदार आहे. तेथे यंदा मजूरटंचाई आणि विपरीत हवामानामुळे पाम तेलाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे मलेशियातील पाम तेलाचे साठे घटल्याचा अंदाज रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव तेजीतच आहेत. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी या काळात भारताची खाद्य तेल आयात ३.७ टक्क्यांनी घटली आहे. यंदा चीनकडूनही सोयाबीनची आयात वाढली आहे. तसेच अर्जंटिनामध्ये उत्पादनात आणि अमेरिकेतील सोयाबीनचे साठ्यांमध्ये घट अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील सोयाबीनच्या दराची पातळी काही प्रमाणात कमी झाली असून, सोयाबीन आता परत १४ डॉलरच्या जवळपास आहे. 

बाजार समिती आवक (क्विंटलमध्ये) किमान कमाल सरासरी 
उद्गिर १४२५ ६३८० ६४८० ६४०० 
कारंजा १४०० ६०५० ६४३० ६२५० 
लातूर ६७६३ ३९६१ ६४५० ६३०० 
अकोला १०५७ ६००० ६३०० ६१५० 
हिंगणघाट १७६६ ५००० ६५५५ ५५७० 
वाशीम २२३१ ६२०० ६५०० ६४०० 
स्रोत : MSAMB (ता: ६ एप्रिल)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT