साखर दरात सुधारणा 
साखर दरात सुधारणा  
ॲग्रोमनी

साखर दरात सुधारणा 

Raj Chougule

कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याबाबत सुरू असलेल्या केंद्राच्या हालचालींमुळे देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी वाढू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झालेली साखर विक्री गती घेत आहे. याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरावरही झाला आहे. गेल्या सप्ताहापासून साखरेच्या विक्री दरात क्विंटलला ५० ते ८० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पहिल्यांदाच साखर विक्रीच्या हालचाली आता कारखाना स्तरावरून वेग पकडत आहेत.  मे च्या उत्तरार्धापासून केंद्राने काही कालावधीकरिता अनलॉकचे धोरण स्वीकारले. यामुळे ज्या भागात कोविडचा कमी प्रादुर्भाव आहे अशी शहरे पूर्वस्थितीवर येत आहे. अनेक घटकांना कालावधीचे बंधन असले तरी साखरेवर आधारित उद्योगधंदे सुरू होऊन दोन ते तीन आठवडे उलटून गेल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या वापरावर होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.  सरकारने मे महिन्याच्या साखर विक्रीचा कोटा वाढवून दिला आहे. उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे चा साखर विक्री कोटा पूर्ण केला आहे. पश्‍चिम, दक्षिणेकडील कारखान्यांचा रखडलेला कोटा आता हळूहळू निर्गत होत आहे. अनेक कारखान्यांकडे मे च्या कोट्याची अगदी थोडी साखर शिल्लक आहे. त्या साखरेची विक्री करण्याची मुदत जूनपर्यंत वाढवून दिल्याने मे चा कोटा येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता कारखानदार सूत्रांनी व्यक्त केली.  केंद्राने जूनचा कोटा १० लाख टन इतका दिला आहे. हा कोटा पूर्ण करण्यातही उत्तर प्रदेशच्या कारखान्यांनी आघाडी घेतली. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूतील कारखाने हळूहळू साखर विक्री करत आहेत. अपवाद वगळता ही राज्ये अनलॉकच्या स्थितीत आहेत. सामाजिक अंतराची मर्यादा पाळून वस्तूंची विक्री सुरू झाल्याने आता उत्पादक साखरेची मागणी करू लागले आहेत. येत्या काही दिवसांत साखरेची मागणी वाढण्याचा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.  ‘एमएसपी’ वाढीच्या हालचालीचाही परिणाम  सप्ताहापूर्वी केंद्र सरकारने एफआरपीसह साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ करण्याबाबत सूतोवाच केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे ही मागणी संबंधित खात्यांनी केली आहे. याचा परिणामही साखरेच्या किमतीवर झाला. भविष्यात साखरेच्या किमती वाढतील या शक्‍यतेने सध्या व्यापाऱ्यांकडून साखर खरेदीसाठी पसंती दिली जात आहे. यामुळे दरातही वाढ झाल्याचे साखर कारखानदार सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT