Rates stabilize as currants rise
Rates stabilize as currants rise 
ॲग्रोमनी

बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिर

टीम अॅग्रोवन

सांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे बेदाण्याचा उठाव होत आहे. गेल्या महिनाभरापासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. सध्या बेदाण्याला प्रति किलोस १७५ ते २४० रुपये असा दर मिळत आहे. दसरा आणि दिवाळीसाठी देशभरातून बेदाण्याची खरेदी सुरू झाली असून, दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणाऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी परिस्थिती पाहूनच बेदाण्याच्या खरेदीला सुरुवात केली होती. देशातून बेदाण्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बेदाण्याच्या दरात वाढ होण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर येणारा उत्सवामुळे पुन्हा बाजारात बेदाणा खरेदीसाठी व्यापाऱ्यांची पुढे आले. 

ऑगस्ट महिन्यापासून गोकुळ अष्टमी आणि गणपती उत्सवामुळे बेदाण्याची विक्री सुरू झाली आहे. त्यादरम्यान बेदाण्याला प्रति किलोस १६० ते २१० रुपये असा दर होता. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी कब्जा केला होता. त्याचा परिणाम देशातील बेदाण्याच्या दरावर झाला होता. अर्थात, बेदाण्याच्या दरात वाढ झाली होती. वास्तविक पाहता, एका महिन्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २५ ते ३० रुपयांनी वाढ वाढ झाली होती.

ऑगस्टच्या अखेरी ६० ते ६५ हजार टन बेदाणा शीतगृहात होता. आता दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बाजारात बेदाण्याची खरेदी सुरू झाली आहे. बहुतांश व्यापाऱ्यांनी अगोदरच बेदाणा खरेदी केला आहे. गतवर्षी याच दरम्यान, राज्यात ९० ते ९५ हजार टन बेदाणा शीतगृहात होता. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ५० ते ६० हजार टन बेदाणा शीतगृहात आहे. अर्थात, गतवर्षीपेक्षा यंदा बेदाण्याला देशभरातून मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३५ ते ४० हजार हजार टनांनी बेदाण्याची अधिक विक्री झाली आहे. बेदाण्याला मागणी आणि उठाव असला तरी बेदाण्याचे दर टिकून आहेत. त्यामुळे याचा फायदा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना होता आहे.

 व्यापाऱ्यांचा मार्केटिंगचा नवा फंडा सध्या बेदाण्याचे सौदे सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तासगाव येथील सौद्यात प्रति किलोस ३२१ रुपये असा दर मिळाला. परंतु हा दर बेदाण्याचे प्रती १५ किलोचे २५ बॉक्सला मिळाला होता. अर्थात एकूण बेदाणा ३७५ किलो होता. त्याची प्रसिद्धी व्यापाऱ्यांकडून केली गेली. तसेच हा दर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला गेला. बेदाण्याला अधिक दर मिळत असल्याने शेतकरी विक्रीस पुढे येतो. पण प्रत्यक्षात बेदाण्याला सरासरी १७५ ते २४० असा दर असतो. म्हणजे व्यापाऱ्यांनी मार्केटिंगचा नवा फंडा सुरू केल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर बाजार समिती नियंत्रण आणणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT