Raisins
Raisins  
ॲग्रोमनी

बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात वाढ 

Abhijeet Dake

सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या पॅकिंगसाठीचे कोरोगेटेड बॉक्सच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षी प्रति बॉक्सचा २२ ते २७ रुपये दर होता. यंदा हाच दर १० ते १२ रुपयांनी वाढून ३२ ते ३७ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात अजून दरात वाढीची शक्यता आहे. त्यामुळे बेदाणा पॅकिंगच्या खर्चात वाढ होणार असल्याने अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे. 

बॉक्स तयार करण्यासाठी युरोपातून इंपोर्टेड वेस्ट आयात केले जाते. या वेस्टच्या माध्यमातून बॉक्स तयार केले जातात. गेल्या वर्षी इंपोर्टेड वेस्टचा दर प्रति किलोस २० रुपये इतका होता. अगदी गेल्या तीन महिन्यांपर्यंत दर २२ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे बॉक्सच्या दरात किंचित वाढ झाली होती. युरोपमधून इंपोर्टेड वेस्ट चीन जादा दराने खरेदी करत असल्याने भारतात आयात थांबली आहे. त्यामुळे दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात बॉक्स तयार करणारे ४० हून अधिक कारखाने आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात बेदाणा तयार होतो. त्यामुळे बेदाणा पॅकिंगसाठी कोरेगेटेड बॉक्सचा मोठा वापर केला जातो. सध्या बॉक्सला मागणी नाही. बेदाण्याचा हंगाम काही दिवसांतच सुरू होणार आहे. आतापासून त्यासाठी लागणाऱ्या बॉक्सची खरेदी केली जाते. परंतु बॉक्सच्या दरात वाढ झाली असल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.  खर्च वाढणार  एक टन बेदाणा तयार करण्यासाठी २३ ते २४ हजार रुपये खर्च येतो. ही रक्कम बॉक्सच्या खर्चासह आहे. परंतु आता बॉक्सच्या किमतीत वाढ झाल्याने बेदाणानिर्मितीच्या खर्चात प्रति टनाला दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा या अतिरिक्त खर्चाचा बोजा बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांवर पडणार आहे.  प्रतिक्रिया बेदाणा तयार झाल्यानंतर पॅकिंगसाठी बॉक्स मोठ्या प्रमाणात लागतात. यंदा बॉक्सच्या दरात वाढ झाली असल्याने बेदाणा तयार करण्याच्या खर्चात देखील वाढ झाली.  - सुनील माळी, बेदाणानिर्मिती व शेडमालक 

युरोप देशातून येणारा (इंपोर्टेड वेस्ट) कच्चा माल भारतात येणे थांबला आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा माल देशात येण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हाच कच्च्या मालाचे दर कमी होतील.  - सुहास कुलकर्णी, बॉक्स कारखानदार, सांगली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT