पोल्ट्री
पोल्ट्री 
ॲग्रोमनी

जोरदार खपामुळे ब्रॉयलर्सचा बाजार वधारला

दिपक चव्हाण

पुणे ः दिवाळीतील जोरदार खपामुळे बहुतांश शिल्लक माल निघून गेल्याने ब्रॉयलर्सचा बाजार वधारला आहे. अंड्यांचा बाजारही दीर्घ अवधीनंतर चांगल्या तेजीत स्थिरावला आहे.  मागील आठवड्यात बेंचमार्क नाशिक विभागात ७६ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर कोंबड्यांचे लिफ्टिंग झाले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात १५ टक्क्यांनी वाढ झाली. पुणे विभागात खाण्याच्या अंड्यांस प्रतिशेकडा ४०६ रु. लिफ्टिंग दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात १२ टक्क्यांनी वाढ झाली. आनंद अॅग्रो समूहाचे व्यवस्थापक डॉ. मोहन गिरी म्हणाले, की दिवाळीपर्वात पक्ष्यांना विक्रमी मागणी होती. सणापूर्वी २.९ वजनाची सरासरी २.४ पर्यंत खाली आलीय. स्वाभाविकपणे बाजारभावात सुधारणा झाली. ६५ रु. प्रतिकिलोवरील बाजार ७८ रु. पर्यंत सुधारला. चालू महिनाअखेरपर्यंत जोरदार खपामुळे बाजारभाव किफायती राहील. औरंगाबादस्थित खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, की मागील दोन रविवार उपवसाचे होते. एक रविवारी संकष्टी तर दुसऱ्या रविवारी एकादशी आल्यामुळे खप मोठ्या प्रमाणावर रोडावला होता. या दोन्ही रविवारमुळे साचलेला माल दिवाळीच्या पर्वात निघून गेला आहे. दिवाळीपूर्वी साधारपणे चार दिवसांचा जादाचा शिल्लक होता, आता तो एका दिवसावर आला आहे. यापुढील काळात दिवाळीच्या सुट्यांमुळे संस्थात्मक मागणी चांगली राहणार आहे.   गुजरात राज्यात दिवाळीनंतर पक्ष्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीनंतरच बाजारभावात सुधारणा अपेक्षित होती, असे आणंद येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल यांनी सांगितले; तर महाराष्ट्रात दिवाळसण हा सर्वाधिक खपाचा असतो. सध्या तर मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने बाजारभावात आणखी तेजी दिसेल, असे नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी सांगितले.  सध्या देशभरात प्रतिकिलो ७२ ते ७८ या दरम्यान बाजारभाव आहेत. राज्याराज्यातील बाजारभावात अधिकचा फरक नाही. सध्याची प्लेसमेंट ही मार्गशीर्ष महिन्यानंतर येईल. जोरदार मागणीमुळे एका दिवसांच्या पिलांचे भाव तेजीत आहेत. हॅचिंग एग्जचे दरही उच्चांकी पातळीवर आहेत. मका आणि सोयामिल या प्रमुख कच्च्या मालाचे दर वाजवी पातळीवर असले तरी पिलांच्या किमतींमुळे उत्पादन खर्च जैसे थे राहत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात मार्गशीर्षमुळे घरगुती मागणी सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात असेल. अनुकूल वातावरणामुळे वजनेही चांगले येतील. या पार्श्वभूमीवर जर पुरवठा नियंत्रित आणि समतोल ठेवला तरच किफायती दर मिळतील, असे दिसते. 

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ७६     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४०५     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४२     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३     प्रतिनग     मुंबई
मका     १४८०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २२८००     प्रतिटन     इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT